Indian mango is special from America to Europe; Reliance also benefits by crores
अमेरिकेपासून युरोपपर्यंत खास आहे भारतीय आंबा; रिलायन्सलाही होतो करोडोंचा फायदा By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 05:47 PM2022-06-16T17:47:08+5:302022-06-16T17:49:14+5:30Join usJoin usNext उन्हाळी हंगामात फळांचा राजा आंब्याने संपूर्ण बाजारपेठ व्यापली. आंबा भारतीयांसाठी खूप खास आहे, तो परदेशातही खूप चवीने खाल्ला जातो. असं मानलं जातं की, जेव्हा पोर्तुगीज पहिल्यांदा भारतात आले तेव्हा ते फक्त मसाले घेऊन गेले नाहीत तर त्यांना आंबे देखील खूप आवडले. आज संपूर्ण जगात भारत हा आंबा उत्पादन करणारा सर्वात मोठा देश आहे. परदेशात त्याची निर्यात (Mango Export) ही खूप जास्त आहे. आंब्याच्या हंगामात रिलायन्स मँगो एक्सपोर्टलाही खूप फायदा होतो, कारण त्यांचा आंबा परदेशातही चांगलाच गाजतो. आजच्या काळात रिलायन्स प्रत्येक क्षेत्रात शिरकाव करत आहे, त्यामुळे भारत हा आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश असताना ती आंब्याच्या निर्यातीत कशी मागे पडेल. रिलायन्स केवळ शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करून निर्यात करतो असं नाही तर त्यांचे स्वत:चे मॅंगो फार्मही आहे रिलायन्सचे गुजरातमधील जामनगर येथे ६०० एकर आंब्याचे फार्म आहे. यामुळेच रिलायन्स ही आंब्याची निर्यात करणारी मोठी कंपनी आहे. आंब्याच्या विविध जातींची निर्यात केली जाते. यामध्ये अल्फोन्सो, केसर, तोतापुरी आणि बंगनापल्ली या आंब्यांची सर्वाधिक निर्यात होते. जामनगर रिफायनरीजवळ जमिनीवर रिलायन्सनं मँगो फार्म उभा केला आहे. ६०० एकर जमिनीवर २०० हून अधिक जाती असलेल्या १.३ लाख आंब्यांची लागवड करण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या स्मरणार्थ या बागेला धीरूभाई अंबानी लक्कीबाग अमराई असे नाव देण्यात आले. भारतातून फक्त आंब्याची निर्यात केली जाते असे नाही, तर आंब्याचा पल्प बनवून, आंब्याचे काप करूनही त्याची निर्यात केली जाते. प्रिझर्वेटिव्हजच्या मदतीने लगदा आणि स्लाइस खराब होण्यापासून दीर्घकाळ संरक्षित केले जाऊ शकतात, म्हणून हे केले जाते. भारत हा जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक तसेच निर्यात करणारा देश आहे. भारतातून युरोपीय संघ, इंग्लंड, आयर्लंड, मध्यपूर्वेसह जगातील अनेक देशांमध्ये आंबा निर्यात केला जातो. या हंगामात ३० मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली आहे. भारताशिवाय ब्राझील, मेक्सिको, पाकिस्तान, पेरू, थायलंड, येमेन, नेदरलँड्स यांसारखे देशही आंब्याची निर्यात करतात. म्हणजेच भारताला जोरदार स्पर्धा मिळत आहे, पण भारतीय आंब्याची बाब फार खास आहे. आंबा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी हे वर्ष अतिशय चांगले आहे. यावेळी अमेरिकेतही आंबा निर्यात होत आहे. त्याला युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर (USDA) ने मान्यता दिली आहे. २०२० मध्ये अमेरिकेने भारतीय आंब्याची खरेदी बंद केली. वास्तविक, कोविड-१९ मुळे USDA निरीक्षक भारतात येऊ शकले नाहीत आणि आंब्याची चाचणी करू शकले नाहीत, त्यामुळे भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात थांबवण्यात आली.टॅग्स :रिलायन्सआंबाRelianceMango