Indian Railways Rules : जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर सामान नेण्याचे नियम जाणून घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 04:29 PM2022-02-19T16:29:30+5:302022-02-19T16:38:25+5:30

Indian Railways Rules : जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त सामान नेले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

नवी दिल्ली : तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. अनेकदा फक्त रेल्वेनेच करणे पसंत करतात. भारतीय रेल्वे हे जगातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असल्याचे म्हटले जाते. म्हणजेच देशात सर्वाधिक लोक रेल्वेने प्रवास करतात.

पण तुम्हाला हे माहित आहे का? ट्रेनमध्ये प्रवाशांना किती सामान नेण्याची परवानगी आहे. जर तुम्ही निर्धारित रकमेपेक्षा जास्त सामान घेऊन जात असाल तर तुम्हाला सहापट जास्त दंड भरावा लागू शकतो.

जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त सामान नेले तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्ही एका ठराविक मर्यादेपर्यंतच सामान नेऊ शकता. रेल्वेच्या नियमांनुसार रेल्वे प्रवासादरम्यान काही वस्तू नेण्यास मनाई आहे. या वस्तू घेऊन रेल्वेमध्ये गेल्यास दंडासह तुरुंगात जावे लागू शकते.

विमान प्रवासाप्रमाणेच रेल्वेमध्येही प्रवासादरम्यान सामान नेण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी रेल्वेकडून कडक नियमही करण्यात आले आहेत. या नियमानुसार, प्रवासी जास्तीत जास्त 50 किलोपर्यंत सामान घेऊन जाऊ शकतो.

जर एखाद्या प्रवाशाकडे यापेक्षा जास्त सामान असेल तर रेल्वेच्या नियमांनुसार त्याला त्याचे वेगळे भाडे द्यावे लागेल. जर एखादा प्रवासी एसी कोचमध्ये प्रवास करत असेल तर तो कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 70 किलोपर्यंतचे सामान सहजपणे घेऊन जाऊ शकतो.

त्याचवेळी, स्लीपरमध्ये प्रवास करणारे प्रवासी त्यांच्यासोबत 40 किलोपर्यंतचे सामान घेऊन जाऊ शकतात. जर तुम्ही यापेक्षा जास्त वाहून नेले तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.

दरम्यान, प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाने निश्चित मर्यादेपेक्षा जास्त सामान नेले तर त्याला वेगळे शुल्क द्यावे लागेल. प्रवाशांना किमान 30 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय रेल्वेनेही या नियमात शिथिलता दिली आहे.

जर एखादा रुग्ण ट्रेनमध्ये प्रवास करत असेल तर रेल्वेच्या नियमानुसार असे प्रवासी ऑक्सिजन सिलिंडर आणि स्टँड घेऊन जाऊ शकतात.