पाकिस्ताननं नाकारलं, मात्र ब्रिटननं स्वीकारलं; निर्यात होणार ३६७५ टन भारतीय साखर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 04:39 PM2021-04-15T16:39:53+5:302021-04-15T16:46:03+5:30

यापूर्वी पाकिस्ताननं भारताकडून साखर घेण्यास दिला होता नकार.

भारत सरकारनं ब्रिटनला ३६७५ टन रॉ / रिफाईन्ड साखर निर्यातीची परवानगी दिली आहे. टॅरिफ रेट कोट्यातून ही परवानगी देण्यात आली.

पाकिस्तानच्या सरकारी मालकीची कंपनी टीसीपीनं काही दिवसांपूर्वी ५० हजार टन पांढरी साखर आयात करण्यासाठी जागतिक निविदा जारी केल्या.

परंतु यात एक अट घालण्यात आली होती. भारत, इस्रायल सारख्या बंदी घालण्यात आलेल्या देशांकडून आयात करण्यात येणार नसल्याचंही त्यात सांगण्यात आलं होतं.

परंतु यानंतर आता सरकारनं भारतीय ब्रिटनला ३६७५ टन अतिरिक्त साखर निर्यात करण्याची परवानगी दिली आहे.

सरकारनं ब्रिटनला ३६७५ टन रॉ / रिफाइन्ड साखर निर्यातीची परवानगी टॅरिफ रेट कोट्याअंतर्गत दिली आहे. हा दर फार कमी असतो.

या रेट कोट्याचा अर्थ असा आहे की काही प्रमाणात साखर ही ठराविक दरानं देण्यात येते. त्यानंतर निर्यात अधिक किंमतीत करण्यात येते.

ब्रिटनला ३० सप्टेंबरपर्यंत रॉ / रिफाईन्ड साखरेचा अतिरिक्त पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कोट्याचं संचालन APEDA द्वारे करण्यात येईल. तसंच ही निर्यात लागू करणारी संस्था आहे.

ही माहिती समोर आल्यानंतर गुरूवारी बलरामपुर शुगर मिल, धामपुर शुगर, केसीपी शुगर, त्रिवेणी इंजिनिअरिंग सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

या व्यतिरिक्त, युरोपियन युनियनच्या सीएक्सएल साखर कोट्याअंतर्गत युरोपियन देशांमध्ये १०,००० टन साखर सवलतीच्या दरात निर्यात करण्याची योजना आहे.

याअंतर्गत व्यापारी अत्यंत कमी निर्यात शुल्क किंवा जवळजवळ शून्य निर्यात शुल्कात साखर निर्यात करु शकतात.