देशातील सर्वात 'पॉवरफुल' उद्योगपती घराणं कोणतं? अंबानी, टाटा, अदानी की जिंदल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:21 IST2025-02-13T14:19:51+5:302025-02-13T14:21:28+5:30
Asia’s 20 Richest Families : आशियातील अव्वल श्रीमंतामध्ये मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांची नावे पहिल्यांदा येतात. मात्र ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या यादीत अदानी यांचे नाव नाही.

जेव्हा आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींची नावे समोर येतात. तेव्हा त्यात मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचाही समावेश होतो. पण, पहिल्यांदाच अशी एक यादी समोर आली आहे. ज्यामध्ये गौतम अदानी यांचे नाव नाही.
वास्तविक, ही यादी श्रीमंत व्यक्तीबाबत नसून श्रीमंत कुटुंबांची आहे. ब्लूमबर्गने आशियातील २० श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत मिस्त्री कुटुंब चौथ्या क्रमांकावर आहे.
जिंदाल कुटुंब सातव्या तर बिर्ला कुटुंब नवव्या क्रमांकावर आहे. याशिवाय भारतातील बजाज कुटुंब आणि हिंदुजा कुटुंबाचाही टॉप २० मध्ये समावेश आहे.
आशियातील टॉप २० श्रीमंत कुटुंबांमध्ये थायलंडचे चेरावानोंट कुटुंब दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती ४२.६ अब्ज डॉलर (सुमारे ३.७० लाख कोटी रुपये) आहे. ही अंबानींच्या एकूण संपत्तीच्या निम्म्याहून कमी आहे.
आशियातील टॉप २० कुटुंबांमध्ये अदानी यांचे नाव नाही. वास्तविक, गौतम अदानी हे पहिल्या पिढीतील उद्योगपती आहेत. त्यामुळे त्यांचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. ही यादी कुटुंबांवर आधारित आहे. ज्यांचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे अशा कुटुंबांचाच त्यात समावेश आहे.