India's unemployment rate rises to 7.78%, highest in 4 months: CMIE MMG
देशातील बेरोजगारीच्या टक्केवारीत वाढ, ग्रामीण भागात उच्चांक By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 11:44 AM2020-03-02T11:44:12+5:302020-03-02T11:53:28+5:30Join usJoin usNext भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारी महिन्यात 7.78 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2019 मध्ये बेरोजगारी दराने उच्चांक गाठला होता, तेव्हा हा दर 7.16 टक्के एवढा होता. त्यामुळे गेल्या 4 महिन्यात पुन्हा बेरोजगारीचा दर वाढीस लागला आहे. (CMIC) सेंटर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी रिसर्च संस्थेच्या अहवालाच्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. भारतीय अर्थव्यवस्था 2019 मधील गेल्या 3 महिन्यांपासून कोलमडली आहे. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात गेल्या 6 वर्षातील सर्वात मोठी घसरण भारतीय अर्थव्यवस्थेची झाली आहे देशातील अनेक उद्योगधंद्यावर अर्थव्यवस्थेचा परिणाम झाला असून बेरोजगारी वाढीस लागल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारी महिन्यात 7.37 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या महिन्यात हीच बेरोजगारी 5.97 टक्क्यांपर्यंत होती. शहरी भागात मात्र गत महिन्याच्या तुलनेत बेरोजगारीचा दर वाढला आहे. गेल्या महिन्यात 9.70 टक्के असलेला दर फेब्रवारी महिन्यात 8.65 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मुंबई स्थित सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमिनीने (CMIE) ही आकडेवारी जाहीर केली आहे. चीनमधील कोरोना व्हायरसचाही परिणाम देशातील अर्थव्यवस्थेवर झाला आहे. जगातील अनेक देशांत कोरोनाचा झालेला संसर्ग, जगातील शेअर बाजारांत झालेली घसरण, परकीय वित्तसंस्थांकडून मोठी विक्री आणि मुडीजने घटविलेला जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज यांमुळे मुंबई शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून बेरोजगारी दर वाढल्याचे दिसून येत आहे. CMIE ने नोव्हेंबर ते फेब्रवारी या 4 महिन्यातील बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. टॅग्स :अर्थव्यवस्थाबेरोजगारीमुंबईEconomyUnemploymentMumbai