JOB Alert : खूशखबर! SBI आणि बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदांसाठी होणार भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 13:09 IST2021-03-11T12:48:26+5:302021-03-11T13:09:09+5:30
State Bank of India And Bank of Baroda JOB Alert : कोरोनाच्या या काळात देश सध्या वेगाने डिजिटलायझेशनच्या दिशेने वाटचाल करत आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनाच्या या काळात देश सध्या वेगाने डिजिटलायझेशनच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत बर्याच बँका ग्राहकांच्या सोयीसाठी डिजिटल बँकिंगकडेही वळल्या आहेत.
ई-बँकिंग सेवांच्या पूर्ततेसाठी सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँका लिटरल हायरिंगची तयारी करत आहेत. देशातील सर्वात मोठ्या बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) लिटरल हायरिंगसाठी प्रमुख आहेत.
डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी आता बँक मध्यम-स्तरीय आणि कनिष्ठ पातळीवर लिटरल हायरिंग करणार आहेत. ज्यामध्ये आयटी क्षेत्र आणि खासगी बँकेशी संबंधित लोकांना संधी दिली जाणार आहे.
लिटरल हायरिंग म्हणजे नेमकं काय?
लिटरल हायरिंग प्रक्रिया म्हणजे ज्या अंतर्गत एखाद्या विशिष्ट कार्यासाठी एखाद्या विशेषज्ञची दुसर्या संस्थेतून नियुक्ती केली जाते. एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या म्हणण्यानुसार डायरेक्ट हायरसाठी कर्मचारी आणि प्रोबेशनरी ऑफिसर (PO) च्या पगाराचं स्ट्रक्चर बदलतं.
अंतर्गत उमेदवार हा एक कायमस्वरुपी कर्मचारी असतो. लिटरल हायरिंगवाले कर्मचारी ही कंत्राटी व्यवस्था आहे. ही विशेष भूमिका असल्याने अंतर्गत उमेदवारांपेक्षा बाजारपेठेतून टॅलेंट मिळवणं अधिक सोपं आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये काम करण्याची संधी
बँक ऑफ बडोदा (BOB) डिजिटल लँडिंग आणि मोबाईल बँकिंगसारख्या काही जागांवर लिटरल हायरिंग करत आहे. एप्रिल 2019 मध्ये देना बँक आणि विजया बँक बीओबीमध्ये विलीन झाल्या.
वित्तीय वर्षाच्या अखेरीस बँकेचे 84,000 कर्मचारी होते. वार्षिक वर्षाच्या आधारे त्याचे मोबाइल बँकिंग ग्राहक 31 डिसेंबरपर्यंत दुप्पट केले आहेत. त्यामुळेच बँक ऑफ बडोदा कॉन्ट्रेक्ट बेसवर मध्यम आणि कनिष्ठ पातळीवर लिटरल हायरिंगचे कंसल्टेंट नियुक्त करण्याची योजना आखत आहेत.
SBI मध्ये या पदावर काम करण्याची संधी
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या FY20 च्या रिपोर्टमध्ये आपलं वेल्थ मॅनेजमेंट, आयटी, इन्फोर्मेशन सिक्योरिटी, रिस्क आणि क्रेडिट एरिया पाहण्यासाठी कॉन्ट्रेक्ट बेसवर लिटरल हायरिंग करत आहे.
हे वेगाने बदलणार्या लँडस्केपच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि नियामक नियमांची पूर्तता करण्यासाठी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने (FSI) एकाच वेळी अनेक पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
या रिक्त जागेत (FSI Recruitment 2021) एफएसआयमध्ये कराराच्या आधारावर टेक्निकल असोसिएट पदासाठी एकूण रिक्त 44 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे.
टेक्निकल असोसिएट पदासाठी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 19 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नोकरीची अधिसूचना fsi.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहेत. नोटिफिकेशननुसार या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 34 वेगवेगळ्या शहरांमध्ये नियुक्त केले जाईल.
फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने (एफएसआय) जारी केलेल्या या रिक्त जागांनुसार एकूण 44 पदांवर भरती होईल. यात उमेदवारांची निवड कराराच्या आधारे होईल. या रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड वॉक इन टेस्टच्या माध्यमातून करण्यात येईल. वॉक इन टेस्टमध्ये लेखी आणि हँड्स-ऑन चाचणीचा समावेश असेल.
हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, पंजाब, छत्तीसगड, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, झारखंड, मणिपूर, मेघालय यासह 34 रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.