Interesting fact about Union Budget: Know Why Budget Represented at 11 o'clock?
जाणून घ्या,अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी 11 वाजता का? 'हे' आहे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 09:29 AM2019-07-05T09:29:45+5:302019-07-05T11:10:31+5:30Join usJoin usNext केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत काही अशा गोष्टी तुम्हाला माहित आहे का? काही वर्षापूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात होता. त्यामागे विशेष कारण होतं. भारतीय अर्थसंकल्पाच्या इतिहासात अशा काही घटना नोंद आहेत. मोदी सरकारच्या काळात अर्थसंकल्पाच्या काही परंपरा बदलल्या गेल्या. पूर्वी अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात मांडला जात होता. जो बदलून 1 फेब्रुवारी निश्चित करण्यात आला. त्याचसोबत रेल्वे अर्थसंकल्प संपवून त्याचा समावेश सामान्य अर्थसंकल्पात केला जाऊ लागला. 2001 मध्ये पहिल्यांदा सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडला गेला. तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तो अर्थसंकल्प सादर केला. त्याआधी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात होता. संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा ब्रिटिश राजवटीपासून सुरु होती. मात्र 2001 मध्ये यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा बदलून सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची नवीन परंपरा सुरु केली. त्यावेळी देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार होतं. जेव्हा देशावर इंग्रजांचे शासन होतं. त्यावेळी संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यामागे एक कारण होतं. त्यावेळी शासन व्यवस्था ब्रिटिश वेळेप्रमाणे चालत होती. ब्रिटनमध्ये सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर होत होता त्यात भारताच्या अर्थसंकल्पाचा समावेश होता. अर्थसंकल्प भारताच्या संसदेत पास होणं गरजेचे होते. म्हणून ब्रिटनमध्ये सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भारतात तो संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात होता. टॅग्स :केंद्रीय अर्थसंकल्प 2019अर्थसंकल्प 2019आयकर मर्यादाजीएसटीUnion BudgetBudget 2019Income Tax SlabGST