टाटाच्या 'या' गोष्टी वाचून तुम्हीही कौतुक कराल; उगाच नाही TATA भारतात नंबर वन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 11:19 AM2022-06-03T11:19:32+5:302022-06-03T11:22:15+5:30

१८६८ मध्ये स्थापन झालेल्या टाटा ग्रुपचा कारभार हा भारतातच नाही तर जगातील १७५ देशांत पसरला आहे. टाटा ग्रुपचे फाऊंडर जमशेदजी टाटा यांना फादर ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हटलं जातं.

भारताची पहिली स्वदेशी कार बनवण्याचं श्रेय टाटा ग्रुपला जातं. कंपनीने १९९८ मध्ये पेसेंजर हॅचबॅक कार टाटा इंडिका बनवली होती. जी देशातील पहिली स्वदेशी कार होती.

टाटा अनेक दशकांपासून लष्करासाठी आर्मर्ड ट्रॅक आणि कॉम्बॅट रेडी वीकल्सचा पुरवठा केला जातो. टाटा ग्रुप भारतीय सैन्यालाही वाहन पुरवठा करते. भारतीय सैन्यात टाटा गाड्यांचा वरचष्मा आहे.

जगातील सर्वात स्वस्त कार बनवण्याचा मानही टाटा ग्रुपला मिळाला आहे. टाटानं २००८ मध्ये नॅनोची निर्मिती केली. सर्वसामान्यांना कार मिळावी यासाठी या कारची किंमत १ लाख रुपये ठेवण्यात आली.

टाटा ग्रुपने कधीही दारू अथवा तंबाखू उद्योगात गुंतवणूक केली नाही. त्याचसोबत टाटा ग्रुपने आतापर्यंत कुठल्याही बॉलिवूड सिनेमालाही आर्थिक सहाय्य केले नाही. २००३ मध्ये कंपनीने बिग बजेट फिल्म ऐतबारला को प्रोड्यूस केले होते.

टाटा ग्रुपनं पहिल्यांदा जे ट्रक बनवले त्यावर मर्सिडिज बेंजचा लोगो लावला होता. त्याचं कारण म्हणजे टाटा ग्रुप आणि डेमलर बेंज यांच्या तांत्रिक भागीदारी होती. त्यामुळे टाटानं निर्मिती केलेल्या ट्रकवर हा लोगो लावण्यात आला होता.

१९५२ मध्ये टाटा ग्रुपनं तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यालयाने सुचवल्यामुळे देशात कॉस्मेटिक्स लॅक्मे ब्रँड सुरू केला होता. पंतप्रधान नेहरू यांनी जमशेद टाटा यांना आग्रह धरला होता.

टाटा ग्रुप जवळपास देशात ८ लाख कर्मचाऱ्यांना काम देते. देशात रेल्वे आणि डिफेन्सनंतर सर्वाधिक रोजगार टाटा ग्रुपकडून देशातील लोकांना दिला जातो. टाटाच्या विविध कंपनीत ८ लाख कर्मचारी आहेत.

देशात आतापर्यंत केवळ एकाच उद्योगपतीला देशातील सर्वोच्च नागरीक सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आले होते. त्या व्यक्तीचं नाव जहांगीर रतनजी दादाभाई टाटा म्हणजे जेआरडी टाटा

टाटा ग्रुपनं सर्वात आधी कर्मचाऱ्यांना ८ तासाची ड्युटी निश्चित केली होती. कर्मचाऱ्यांसाठी मोफत मेडिकल सेवा आणि भविष्य निधी योजनेची सुरुवातही टाटा कंपनीने केली होती. कुठल्याही कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यास नुकसान भरपाई देण्याची सुविधा टाटानेच दिली.

२००८ च्या मंदीमध्ये जेव्हा अमेरिकेची दिग्गज ऑटो कंपनी फोर्डचं दिवाळं निघण्याच्या तयारीत होतं तेव्हा टाटा ग्रुपनं त्याची लग्झरी ब्रॅड कार Jaguar Land Rover खरेदी केली.