LIC Scheme : LICच्या या स्किममध्ये पडतोय पैशांचा पाऊस, 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 28 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 09:36 PM2022-08-24T21:36:12+5:302022-08-24T21:48:49+5:30

ही पॉलिसी वयाच्या 12 व्या वर्षापासून सुरू केली जाऊ शकते. यात गुंतवणुकीचे कमाल वय 45 वर्षे एवढे आहे.

जर आपण सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी खास आपल्यासाठीच आहे. खरे तर, शेअर बाजारात नफा अधिक मिळतो. पण तेथे जोखीमही तेवढीच असते. अशा स्थितीत, जर आपल्याला जोखीम न घेता चांगला नफा हवा असेल तर एलआयसीची स्किम आपल्यासाठी अधिक चांगला पर्याय ठरू शकते. आज आम्ही आपल्याला अशाच एका चांगला नफा मिळवून देणाऱ्या एलआयसीची स्किमसंदर्भात माहिती देणार आहोत

एलआयसीचा सुपरहिट प्लॅन - भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आपल्याला बचतीसोबतच सुरक्षिततेची गॅरंटीही देते. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात इर्डाच्या नियमांचे पालन करणारी खास पॉलिसी म्हणजे - एलआयसी जीवन प्रगती प्लॅन (LIC Jeevan Pragati Plan). या पॉलिसीत गुंतवणूक केल्यानंतर आपण केवळ लखपतीच होऊ शकत नाही, तर यात रिस्क कव्हरही मिळते. हा प्लॅन 3 फेब्रुवारी 2016 रोजी लॉन्च झाला होता.

डेथ बेनिफिटही मिळेल - भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जीवन प्रगती प्लॅनमध्ये नियमितपणे प्रीमियम भरावे लागते. या पॉलिसीमध्ये, आपल्याला लाईफ कव्हर (डेथ बेनिफिट) देखील मिळतो. जो दर 5 वर्षांनी वाढतो. ही रक्कम आपली पॉलिसी केव्हापासून अॅक्टिव्ह आहे, यावर अवलंबून असते.

जाणून घ्या पॉलिसीची 'खासियत' - यात पॉलिसी घेतल्यापासून 5 वर्षांपर्यंत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास बेसिक सम अश्योर्डच्या (विम्याची मूळ रक्कम) 100 टक्के दिले जातात.

तसेच, पॉलिसी घेतल्यानंतर 6 वर्ष ते 10 वर्षांच्या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास 125%, 11 ते 15 वर्षांदरम्यान मृत्यू झाल्यास 150% आणि 16 ते 20 वर्षांदरम्यान मृत्यू झाल्यास 200% रक्कम दिली जाते.

या प्लॅनमध्ये अॅक्सिडेंटचा लाभ आणि अपंगत्व रायडरचाही लाभ घेता येतो. मात्र, यासाठी आपल्याला थोडी अधिक रक्कम द्यावी लागते. हा प्लॅन मॅच्योर (Maturity Benefit) झाल्यानंतर आपल्याला 28 लाख रुपये एवढी रक्कम मिळेल.

किती आणि कशा पद्धतीने मिळेल रक्कम? या योजनेत आपल्याला एकूण 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणूकदाराला दर महिन्याला 6 हजार रुपये म्हणजेच दिवसाला 200 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ही पॉलिसी वयाच्या 12 व्या वर्षापासून सुरू केली जाऊ शकते. यात गुंतवणुकीचे कमाल वय 45 वर्षे एवढे आहे.