Invest just Rs100 daily and earn Rs1 Crore Invest through NPS SIP here are some tips
रोज फक्त १०० रुपये गुंतवून मिळवा १ कोटी रुपये! कसं? जाणून घ्या सोप्या शब्दांत कमाईचा राजमार्ग By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 08:08 AM2022-11-10T08:08:40+5:302022-11-10T08:17:06+5:30Join usJoin usNext राष्ट्रीय निवृत्ती वेतन यंत्रणा (एनपीएस) ही निवृत्ती वेतनासाठीच नव्हे, तर गुंतवणुकीसाठीही चांगला पर्याय ठरत आहे. म्युच्युअल फंडाप्रमाणेच एसआयपी माध्यमातून एनपीएसमध्ये गुंतवणूक करता येते. एनपीएसतून ६० वर्षांचे वयापर्यंत भलीथोरली रक्कम एकरकमी मिळू शकते, तसेच निवृत्ती वेतन मिळते ते वेगळेच. यात वर्षाला १.५ लाख रुपयांची कर सवलतही मिळते. एनपीएसमधील रक्कम वयाच्या ६० व्या वर्षी पक्व होते.असे उभे राहतील १ कोटी रुपये परताव्याचे एक गणित- गुंतवणूकदाराचे वय : ३० वर्षे, रोजची गुंतवणूक : १०० रुपये (दरमहा ३००० रुपये), गुंतवणूक कालावधी : ३० वर्षे (६० वर्षे वयापर्यंत), अंदाजे परतावा : १२%, एकूण गुंतवणूक रक्कम : १०.८ लाख रुपये, गुंतवणुकीवर मिळालेला परतावा : ९४.७ लाख रु, एकूण रक्कम : १.०५ कोटी रु. निवृत्ती वेतन खरेदी : ४०%, निवृत्ती वेतनावर अंदाजे परतावा : ६%, निवृत्तीनंतर एकरकमी हाती येणारा निधी : ६३.५३ लाख रुपये, निवृत्तीनंतर मासिक निवृत्ती वेतन : २१,१८० रुपयेदोन प्रकारे करता येते एसआयपी एनपीएससाठी एसआयपी सुरू करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीनुसार, ज्या बँकेत अथवा पीओपी (पॉइंट ऑफ पर्चेस) येथे एनपीएस खाते उघडले आहे, तेथे संपर्क करा. बँक तुम्हाला एनपीएसमध्ये ठराविक मुदतीत निश्चित रक्कम गुंतवायची परवानगी देईल. दुसऱ्या पद्धतीनुसार, डायरेक्ट रेमिटन्सच्या (डी-रेमिट) माध्यमातून थेट एनपीएस करता येते. डी-रेमिटद्वारे गुंतवणुकीसाठी किमान मर्यादा ५०० रुपये आहे. १२% सरासरी परतावा एनपीएस इक्विटी, जी-सॅक, बाँड्स यांसारख्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करते. गुंतवणूकदार ७ पेन्शन फंडांपैकी एकाची निवड करू शकतो. इक्विटी अथवा डेट फंडांचा पर्यायही निवडता येतो.डी-रेमिटद्वारे अशी सुरू करा एसआयपी प्रथम व्हर्च्युअल आयडी बनवा. व्हर्च्युअल आयडी परमनंट रिटायरमेंट अकाउंटशी लिंक करा. पीआरएएनवरून लिंक मोबाइलवर ओटीपी येईल. त्याद्वारे पडताळणी पूर्ण करा. नेट बँकिंगद्वारे ट्रस्टी बँकेच्या आयएफएसीद्वारे निर्मित व्हर्च्युअल आयटीला लिंक करा. ऑटो डेबिट किंवा मासिक अथवा तिमाही योगदान निवडा.टॅग्स :गुंतवणूकInvestment