Invest Rs 2 per day, get 36,000 pension; Learn how to register of this scheme
रोज २ रुपये गुंतवा, ३६ हजार पेन्शन मिळवा; कशी कराल नोंदणी, जाणून घ्या...! By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 01:09 PM2022-06-23T13:09:55+5:302022-06-23T13:26:38+5:30Join usJoin usNext २ रुपये गुंतवून निवृत्तीत ३६ हजार पेन्शन कशी मिळवता येईल ते जाणून घेऊ.... प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात भविष्यासाठी बचत केली पाहिजे. एकाच वेळी मोठी रक्कम जमा होणार नाही, परंतु, थोड्या बचतीसह, आपण भरपूर पैसे जमा करू शकतो. २ रुपये गुंतवून निवृत्तीत ३६ हजार पेन्शन कशी मिळवता येईल ते जाणून घेऊ....नेमकी योजना काय? मोदी सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना सुरु केली असून, रोज फक्त २ रुपये गुंतविल्यास वार्षिक ३६ हजार रुपयांपर्यंत निवृत्तिवेतन त्यातून कामगारांना मिळू शकते.कोण सहभागी होईल? या योजनेत कोणालाही सहभागी होता येईल. योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थीचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. आधारकार्डही आवश्यक आहे. किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असे वय असावे लागेल.आवश्यक दस्तावेज- आधारकार्ड, बचत अथवा जनधन बँक खात्याचे पासबुक, मोबाइल क्रमांक, संमतिपत्रमहिन्याला किती जमा करावेत?- पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत कामगारास दर महिन्याला ५५ रुपये जमा करावे लागतील. १८ वर्षे वयाच्या कामगाराने रोज २ रुपये याचदून या योजनेत गुंतविले तर त्यास वार्षिक ३६ हजार रुपयाचे निवृत्तिवेतन मिळेल. तर त्यास दरमहा २०० रुपये जमा कराये लागतील. या योजनेत वयाच्या ६०व्या वर्षा निवृत्तिवेतन सुरू होईल. महिन्याला तीन हजार रुपये म्हणजेच दर्याला ३६ हजार रुपयाचे निवृत्तिवेतन व्यक्तीस मिळेल. कशी कराल नोंदणी- या योजनेसाठी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) नोंदणी करावी लागेल. सीएससी सेंटरमध्ये कामगार पोर्टलवर आपली नोंदणी करु शकतात. या योजनेसाठी सरकार वेब पोर्टल तयार करीत आहे. सीएससीच्या माध्यमातून सर्व ऑनलाइन माहिती भारत सरकारकडे पोहोचेल. टॅग्स :गुंतवणूकभारतInvestmentIndia