पैसा बुडायचे टेन्शन सोडा! इथे गुंतवा...; सरकारी योजनांमध्ये मिळतेय जबरदस्त व्याज By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 02:01 PM 2020-12-13T14:01:34+5:30 2020-12-13T14:12:25+5:30
Saving Schemes of Government Of India, Post Office: जोखीम पत्करायची नसेल तर सरकारी स्कीम खूप विश्वासाच्या असतात. भारतीय पोस्ट खाते, सरकारी बँका आणि केंद्र सरकार मिळून या स्कीम राबवत असतात. यावर ४ टक्क्यांपासून ते ७.६ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते. चला तर मग जाणून घेऊया या योजना. कोरोना काळात सर्वांनाच सेव्हिंग, गुंतवणुकीचे महत्व कळले आहे. यामुळे इन्शुरन्स, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचा ओढा वाढू लागला आहे. परंतू या सगळ्यात जोखीम हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण कंपन्यादेखील कोरोना संकटात सापडल्या आहेत.
अशावेळी जोखीम पत्करायची नसेल तर सरकारी स्कीम खूप विश्वासाच्या असतात. भारतीय पोस्ट खाते, सरकारी बँका आणि केंद्र सरकार मिळून या स्कीम राबवत असतात. भारत सरकारच्या अनेक बचत योजना आहेत. यावर ४ टक्क्यांपासून ते ७.६ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते. चला तर मग जाणून घेऊया या योजना.
या योजनांमध्ये पैसे गुंतवून तुम्ही गॅरंटीड रिटर्न मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या योजना.
पोस्ट खाते पोस्ट खात्यामध्ये गुंतवणूक हा सर्वात जुना आणि सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये केवळ ५०० रुपये जमा करून बचत खाते सुरु करता येते. या योजनेत वर्षाला ४ टक्के व्याज मिळते.
याशिवाय पोस्टात टाइम डिपॉझिट अकाऊंटही खोलता येते. यामध्ये १ ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. ३ वर्षांसाठी ५.५ टक्के आणि पाच वर्षांसाठी ६.७ टक्के व्याज मिळते.
पोस्टात आरडी पोस्ट खात्यात रिकरिंग डिपॉझिटवर जास्त व्याज दिले जाते. यामध्ये ५.८ चे व्याज देतात. तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी पती-पत्नी मिळून ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. यामध्ये ५ वर्षांसाठी रक्कम लॉक होते आणि ७.४ टक्के व्याज मिळते.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांसाठी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) सध्या ६.८ टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये आयकरातूनही सूट मिळते. यामध्ये ५ वर्षांसाठी रक्कम लॉक होते. NSC गहाण ठेवून बँकेत कर्जही घेऊ शकता.
पीपीएफ भारतात सर्वाधिक लोकप्रिय योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF). ही गुंतवणूक १५ वर्षांनी मॅच्युअर होते. या रकमेवरही ५ वर्षांचा लॉकईन पिरिएड असतो. ५०० रुपयांपासून ते १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. सध्या यामध्ये ७.१ टक्क्यांचा रिटर्न दिला जात आहे. हे खाते बँक, पोस्टात कुठेही उघडले जाऊ शकते.
किसान विकास पत्र (KVP) भारताची मोठी लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते आणि शेतकरी आहे. यामुळे सरकारने किसान विकास पत्र योजना सुरु केली आहे. या योजनेतून १००० रुपयांमध्ये खाते उघडता येते. यावर सध्या ६.९ टक्के व्याज दिले जाते. ही रक्कम १२४ महिन्यांत दुप्पट होते. पोस्टात ही योजना आहे.
सुकन्या समृद्धी योजना जर तुमच्या मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी आहे तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. सध्या या योजनेवर ७.६ टक्के व्याज मिळते. एक व्यक्ती त्याच्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. मुली २१ वर्षांच्या झाल्यावर पैसे काढता येतात. ९ वर्षे, ४ महिन्यांत पैसे डबल होतात.