Investing in EPF is more profitable than others!
ईपीएफमधील गुंतवणूक इतरांपेक्षा फायदेशीरच! By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 08:12 AM2022-06-07T08:12:30+5:302022-06-07T08:25:29+5:30Join usJoin usNext EPF : गेल्या वर्षी ईपीएफवरील व्याजदर ८.५% होता. तो नुकताच घटवून ८.१ टक्के करण्यात आला आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) मिळणारा व्याजदर घटवून ८.१ टक्के केला असला तरी ईपीएफमधील गुंतवणूक अजूनही इतर योजनांच्या तुलनेत फायदेशीर आहे, कसे ते जाणून घेउ. खरेच फायदा होतो का? गेल्या वर्षी ईपीएफवरील व्याजदर ८.५% होता. तो नुकताच घटवून ८.१ टक्के करण्यात आला आहे. हा ईपीएफवरील ४० वर्षांतील सर्वांत कमी व्याजदर ठरला आहे. व्याजदर ४० वर्षांच्या नीचांकावर गेल्यानंतर ईपीएफमधील गुंतवणूक खरेच फायदेशीर आहे का, असा प्रश्न या योजनेच्या लाभधारकांच्या मनात निर्माण झाला आहे. सार्वजनिक भविष्य निधीसह (पीपीएफ) इतरही काही योजनांशी तुलनाही लोक करीत आहेत. मात्र, या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले की, इतर कोणत्याही योजनेच्या तुलनेत ईपीएफची गुंतवणूक अजूनही फायदेशीरच आहे.ईपीएफ व पीपीएफमधील फरक ईपीएफ आणि पीपीएफ या योजनांत अनेक बाबतींत फरक आहे. वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफमधील गुंतवणूक बंधनकारक आहे. विशेष म्हणजे, खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांसाठी हे बंधनकारक आहे. पीपीएफमधील गुंतवणूक मात्र संपूर्णत: ऐच्छिक आहे. पीपीएफ खात्यातील पैशावर ७.१ टक्के व्याज मिळते. ईपीएफमधील पैशांवर १ टक्का अधिक म्हणजेच ८.१ टक्के व्याज मिळते. निवृत्तीनंतर ईपीएफमधील पैसा कर्मचाऱ्यास एकरकमी मिळतो. पीपीएफमधील पैसा १५ वर्षांनंतर एकरकमी मिळतो. गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय ईपीएफमधील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा अजूनही महागाईच्या दरापेक्षा अधिक आहे. त्यामुळे परवाच्या व्याजदर कपातीनंतरही ईपीएफ हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे. - बलवंत जैन, गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ. टॅग्स :पैसागुंतवणूकभविष्य निर्वाह निधीMONEYInvestmentProvident Fund