PPF, NSC, सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करताय? मग, जाणून घ्या काही खास माहिती... By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 07:45 PM 2021-07-28T19:45:36+5:30 2021-07-28T19:52:45+5:30
investing : Postinfo मोबाईल अॅपवरून तुम्हाला आता सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूकीवर किती रिटर्न मिळेल, तुमची बचत तुम्हाला किती श्रीमंत करेल याची माहिती मिळू शकेल. सरकारकडून बर्याच लहान बचत योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना (SSY), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना खूप लोकप्रिय आहेत. परंतु या सर्व योजनांमध्ये परतावा (रिटर्न) किती मिळेल, याचे ट्रॅकिंग म्हणजेच मागोवा घेणे थोडे अवघड आहे, परंतु आता तुम्ही असे कॅल्क्युलेट करून शकता की, योजना तुम्हाला किती श्रीमंत करु शकतात.
या योजनांमधील गुंतवणूकीवरील रिटर्न ट्रॅकिंग करणे अवघड असल्यामुळे या योजना तरुणांमध्ये फारसे पसंत नाहीत. दुसरीकडे एसआयपी, म्युच्युअल फंड यासारख्या योजनांचा ऑनलाईन ट्रॅकिंग करणे सोपे आहे, परंतु आता सरकारी योजनांमध्ये गुंतवणूकीवर रिटर्न ट्रॅकिंग करण्याची समस्या दूर झाली आहे.
Postinfo मोबाईल अॅपवरून तुम्हाला आता सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूकीवर किती रिटर्न मिळेल, तुमची बचत तुम्हाला किती श्रीमंत करेल याची माहिती मिळू शकेल. छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूकीचे गणित आणि रिटर्नचे गणित सुलभ करण्यासाठी इंडिया पोस्टने हे अॅप सुरू केले आहे.
Postinfo हे व्याज कॅल्क्युलेटर अॅप आहे. साधारणत: सरकारी योजनांमध्ये व्याज दर आधीपासूनच निश्चित केला जातो. त्यामुळे त्यांच्यावरील रिटर्न देखील निश्चित असते. अशा परिस्थितीत Postinfo अॅप आपल्याला व्याज कॅल्क्युलेशन करून आपल्या गुंतवणूकीवर किती रिटर्न मिळेल हे सांगते.
Postinfo अॅपवर आपल्या बचतीचा रिटर्न जाणून घेणे खूप सोपे आहे. आपल्याला एवढंच करायचे आहे की, योजनेच्या व्याज कॅल्क्युलेटरवरील आपल्या गुंतवणूकीतील योगदानाची माहिती द्यावी लागेल. यानंतर तुम्ही आतापर्यंत एखाद्या योजनेत किती गुंतवणूक केली आहे, आपल्या गुंतवणूकीवर आपल्याला किती व्याज मिळाले आणि योजना मॅच्योर झाल्यावर आपल्याला किती रक्कम मिळेल याबद्दल अॅपचा कॅल्क्युलेटर सांगेल.
Postinfo अॅपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कॅल्क्युलेटर आपल्याला प्रत्येक वर्षी आपल्या बचतीवर मिळणार्या व्याज किंवा रिटर्नची वेगवेगळी कॅल्क्युलेशन देखील देते. हे आपल्या बचतीवर दर वर्षी आपण किती पैसे कमवतात हे दाखविते.
Postinfo अॅप सरकारच्या प्रत्येक बचत योजनेनुसार गुंतवणूकीवरील रिटर्न कॅल्क्युलेट करते. अशा परिस्थितीत जरी सरकारने व्याजदरात बदल केले तरी हे अॅप नवीन व्याजदरानुसार गुंतवणूक आणि त्यावरील रिटर्नला आपोआप कॅल्क्युलेटर करते.
Postinfo अॅपवर वरील योजनांमधील गुंतवणूकीवरील रिटर्नच कॅल्क्युलेट करू शकत नाही तर डाक जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा सारख्या टपाल कार्यालय विमा योजनेच्या प्रीमियम सुद्धा कॅल्क्युलेट करू शकते.