Child Mutual Fund: मुलांच्या नावानं सुरू करा SIP; महिन्याला ५ हजार गुंतवल्यास मोठं झाल्यावर पाहा किती मिळतील पैसै By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:13 PM 2021-04-12T13:13:58+5:30 2021-04-12T13:19:13+5:30
Child Plan: सध्या मुलांचं शिक्षण खुप महाग होत जात आहे. विशेष करून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मोठा खर्च येत असतो. काही म्युच्युअल फंडांवर मिळतं १६ टक्क्यांपर्यंत रिटर्न. सध्या मुलांचं शिक्षण हे फारच खर्चिक होऊ लागलं आहे. विशेष करून मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी पालकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो.
आपला पाल्य मोठा अथवा मोठी होईपर्यंत त्यांच्यासाठी चांगली रक्कम जमा करावी जेणेकरून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चास मदत होईल असा अनेकांचा विचार असतो.
यासाठी काही पालक हे गुंतवणूकीच्या काही बचत योजनांमध्ये पैसे गुंतवत असतात. परंतु सध्या स्मॉल सेविंग्सवर आता रिटर्न कमी झाला आहे.
त्यामुळे आपल्या पाल्यांसाठी आवश्यक असलेली रक्कम तितकी जमवणं शक्य नाही. अशा पद्धतीत चाईल्ड म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
बाजारात अशी अनेक फंड हाऊसेस आहेत जी मुलांसाठी खास म्युच्युअल फंड योजनेचा लाभ देत आहेत. एचडीएफसी, एसीबीआय, अॅक्सिस, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, टाटा आणि युटीआयसारख्या फंडांसाठी लहान मुलांचे प्लॅन्स उपलब्ध आहेत.
जर त्यांच्या रिटर्नबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी गेल्या १५-२० वर्षांमध्ये १२ ते १५ टक्के वार्षिक रिटर्न दिला आहे.
BPN फिनकॅपच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार मुलांच्या नावानं कोणत्याही चांगल्या म्चुच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. ज्यासह केवळ चाईल्ड असं असेल त्याच फंडात गुंतवणूक केली पाहिजे असं काही अनिवार्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
याव्यतिरिक्त पालक अन्य म्युच्युअल फंडांचाही पर्याय निवडू शकतात. जर तुम्ही मुलांच्या नावे SIP करत असाल तर मर्यादा किमान १५ वर्ष असावी, असंही त्यांनी नमूद केलं.
HDFC चिल्ड्रेंस गिफ्ट फंडनं लाँचनंतर १६.१६ टक्क्यांचं वार्षिक रिटर्न दिलं आहे. ५००० रूपयांची महिन्याला एसआयपी केल्यात त्यात १५ वर्षानंतर ३० लाख रूपये मिळू शकतात. (source: value research)
ICICI प्रुडेंन्शिअल चाईल्ड केअर फंडनं लाँचनंतर १५.४८ टक्के रिटर्न दिले आहेत. ५ हजार रूपयांच्या महिन्याच्या एसआयपीवर १५ वर्षांनी तुम्हाला २४ लाख मिळू शकतात. (source: value research)
SBI मॅग्नम चिल्ड्रेन बेनिफिट फंडनं लाँचनंतर १०.३६ टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. ५००० रूपये महिन्याला एसआयपी केल्यास १५ वर्षात २० लाख मिळू शकतात. (source: value research) (या सर्व फंड्सनं बाजारात १५ वर्षे पूर्ण केली आहेत. एसआयपीची गणना आतापर्यंत देण्यात आलेल्या व्याजाच्या आधारावर केली आहे.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार काही चाईल्ड प्लॅन इक्विटी आणि डेटच्या कंपोझिशनच्या आधारावर गुंतवणूकदारांना निरनिराळे पर्याय देतात.
अधिक जोखीम पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अधिक डेटवाला पोर्टफोलियो निवडण्याचा पर्याय, तर अॅग्रेसिव्ह गुंतवणूकदारांना अधिक इक्विटी असलेले पोर्टफोलियो निवडण्याचा पर्याय मिळतो.
चाईल्ड प्लॅनसह एक फायदा म्हणजे याला लॉक इन पिरिअड असतो. त्यामुळे एका मर्यादेपर्यंच तुम्ही पैसे काढू शकत नाही.
(नोट : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. लोकमत कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीची शिफारस करत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी स्वत: माहिती मिळवा किंवा तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)