Investment: PPF योजनेमध्ये सरकारने केला मोठा बदल, पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 12:51 PM 2023-02-11T12:51:51+5:30 2023-02-11T12:55:48+5:30
Investment: जर तुम्ही भविष्यकाळातील गरजा विचारात घेऊन पीपीएफ अकाऊंट उघडलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारकडून वेगवेगळ्या वेळी या प्रकारच्या छोट्या बचत योजनांमध्ये बदल केले जातात. जर तुम्ही भविष्यकाळातील गरजा विचारात घेऊन पीपीएफ अकाऊंट उघडलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारकडून वेगवेगळ्या वेळी या प्रकारच्या छोट्या बचत योजनांमध्ये बदल केले जातात. त्याशिवाय प्रत्येक तिमाहीमध्ये पीपीएफ अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजाचीही समीक्षा केली जाते. मात्र गेल्या काही काळापासून व्याजदर ७.१ टक्क्यांवर स्थिर आहे. गेल्या काही काळात पीपीएफमध्ये झालेल्या बदलांचा हा आढावा.
पीपीएफ खात्यामध्ये तुमचं योगदान ५० रुपयांच्या पटीत असलं पाहिजे. प्रत्येक वर्षी तुम्ही किमान ५०० रुपयांपासून ते कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम या खात्यामध्ये जमा करू शकता. त्याशिवाय तुम्ही एक महिन्यामध्ये एकावेळीच पीपीएफ अकाऊंटमध्ये पैसे जमा करू शकता.
पीपीएफ अकाऊंट उघडण्यासाठी फॉर्म ए च्या जागी फॉर्म-१ जमा करावा लागतो. १५ वर्षांनंतर पीपीएफच्या विस्तारासाठी मॅच्युरिटीच्या एकवर्षापूर्वी फॉर्म एच ऐवजी फॉर्म ४ अंतर्गत अर्ज करावा लागेल.
तुम्ही पैसे जमा न करता पीपीएफ अकाऊंटला १५ वर्षांनंतर चालू ठेवू शकता. त्यामध्ये तुम्हाला पैसे जमा करण्यासाठी अनिवार्यता नसेल. मॅच्युरिटीनंतर जर तुम्ही पीपीएफ अकाऊंचा विस्तार करण्याचा पर्याय निवडत असाल तर एका आर्थिक वर्षामध्ये तुम्ही एकदाच पैसे काढू शकता.
पीपीएफमध्ये जमा पैशांवर जर तुम्ही कर्ज घेतले तर व्याजदर २ टक्क्यांनी घटून एक टक्का एवढा करण्यात आला आहे. कर्जाच्या मूळ रकमेचा भरणा केल्यानंतर तुम्हाला दोन पेक्षा अधिक पेक्षा अधिक हप्त्यांमध्ये व्याज जमा करावे लागेल. व्याजाची गणती दर महिन्याचा १ तारखेपासून होईल.
तुम्हाला पीपीएफ अकाऊंटवरून कर्ज घ्यायचं असेल तर अर्ज करण्याचा तारखेच्या दोन वर्षे आधी अकाऊंटमध्ये जमा असलेल्या पीपीएफ बॅलन्स २५ टक्केच कर्ज घेऊ शकता. उदाहरणार्थ तुम्ही ३१ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच ३१ डिसेंबर २०१९ रोजी पीपीएफ अकाउंटमध्ये जर १ लाख रुपये असतील तर तुम्हाला याच्या २५ टक्केच कर्ज मिळेल.