₹१०००० ची गुंतवणूक, ६० व्या वर्षी जमा होईल ₹२.३ कोटींचा फंड आणि ₹७५००० पेन्शन, पाहा कॅलक्युलेशन By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 10:25 AM 2024-09-13T10:25:38+5:30 2024-09-13T10:33:40+5:30
NPS Calculation: तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा मग प्रोफेशनल, निवृत्ती नंतर मासिक पेन्शन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवते. आपल्या दैनंदिन आणि इतर गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. NPS Calculation: तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा मग प्रोफेशनल, निवृत्ती नंतर मासिक पेन्शन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवते. आपल्या दैनंदिन आणि इतर गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांना एकरकमी पैसा तर मिळतोच, शिवाय दरमहा पेन्शनही मिळेल.
यासाठी खासगी कर्मचारी किंवा प्रोफेशनल्सनं निवृत्तीचं नियोजन कसं करतात, हा प्रश्न आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम (Nation pension System) हा एक पर्याय आहे जो रिटायरमेंट कॉर्पससह मासिक पेन्शनची सुविधा प्रदान करतो. एनपीएस हे जगातील सर्वात स्वस्त पेन्शन प्रोडक्ट आहे.
आपण एका कॅलक्युलेशनवरून समूजन घेऊ. तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षापासून दरमहा १०,००० रुपयांची गुंतवणूक केली तर वयाच्या ६० व्या वर्षापासून कॉर्पस किती असेल आणि पेन्शन किती मिळेल हे पाहूया. एनपीएस ट्रस्ट पेन्शन कॅल्क्युलेटरच्या मदतीनं हे कॅलक्युलेशन करण्यात आलं आहे.
जर तुम्ही एनपीएसमध्ये महिन्याला १० हजार गुंतवले तर ६० व्या वर्षापर्यंत तुम्ही भरलेली एकूण रक्कम ४२ लाख रुपये होईल. गुंतवणूकीवर अंदाजे १० टक्के रिटर्न मिळाले असं समजून. यानंतर मॅच्युरिटीवर तुमची एकूण जमा रक्कम ३,८२,८२,७६८ रुपये असेल. यानंतर जर तुम्ही ४० टक्के अॅन्युइटी घेतली तर, तुम्हाला एकरकमी २,२९,६९,६६१ कोटी रुपये मिळतील. जर अॅन्युइटी रेट वार्षिक अंदाजे ६ टक्के पकडला तर ६० व्या वर्षी तुम्हाला महिन्याला ७६,५६६ रुपये मिळतील.
अॅन्युइटीची रक्कम जितकी जास्त असेल तितकी जास्त पेन्शन मिळेल. एनपीएसमध्ये जमा झालेली रक्कम गुंतविण्याची जबाबदारी पीएफआरडीएनं नोंदणीकृत पेन्शन फंड व्यवस्थापकांना दिली आहे. ते तुमची गुंतवणूक इक्विटी, सरकारी सिक्युरिटीज आणि नॉन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज व्यतिरिक्त फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवतात.
अॅन्युइटी म्हणजे तुमचा आणि इन्शुरन्स कंपनीचा करार असतो. या करारानुसार नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये (एनपीएस) किमान ४० टक्के रकमेची अॅन्युइटी खरेदी करणे आवश्यक आहे. ही रक्कम जितकी जास्त तितकी पेन्शनची रक्कम जास्त असते. अॅन्युइटी अंतर्गत गुंतविलेली रक्कम निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून मिळते आणि एनपीएसची उर्वरित रक्कम एकरकमी काढता येते.
एनपीएसमध्ये प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सीसीडी (१ बी) अंतर्गत ५०,००० रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर अतिरिक्त कर वजावटीचा लाभ मिळतो. जर तुम्ही कलम ९० सी मध्ये १.५ लाख रुपयांपर्यंतची मर्यादा पूर्ण केली असेल तर तुम्ही या अतिरिक्त टॅक्स बेनिफिटचा लाभ घेऊ शकता. (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)