Investment Plan: follow the rule 15*30*20; Becoming a millionaire will be easy
बघ भाऊ, १५*३०*२० हा नियम फॉलो कर; कोट्यधीश बनणं सहज सोप्पं होईल By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 02:43 PM2023-03-07T14:43:09+5:302023-03-07T14:45:57+5:30Join usJoin usNext जगातील प्रत्येकाला श्रीमंत होण्याची इच्छा असते. यासाठी लोक खूप मेहनत घेतात. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांचे उत्पन्न खूप चांगले आहे. मात्र त्यानंतरही ते श्रीमंत होऊ शकले नाही. करोडपती होण्यासाठी खूप पैसे गुंतवावे लागतात असं लोकांना वाटते. हे खरे नसले तरी दर महिन्याला पगारातून काही पैसे जरी वाचले तरी तुम्ही श्रीमंत होऊ शकता. पैसे वाचवण्याचे मार्ग आहेत. त्याचबरोबर ही बचत कुठे गुंतवायची हे जाणून घेणेही खूप गरजेचे आहे. यासाठी १५*३०*२० हा नियम अतिशय उपयुक्त आहे. हा नियम पैसे वाचवण्याचा एक प्रभावी मार्ग बनत आहे. हा नियम फॉलो केला तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत बनू शकता. त्याचबरोबर ही बचत योग्य ठिकाणी गुंतवून तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकता. जाणून घेऊया नक्की काय आहे? १५*३०*२० चा नियम काय आहे? आपल्या कमाईच्या पैशाचे व्यवस्थापित करणे सोपे नाही. कधी कधी सुरुवात कुठून करावी हे समजणे कठीण असते. अशा परिस्थितीत १५*३०*२० चा नियम खूप उपयुक्त आहे. तुमचे पैसे वाचवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता. हा नियम तुमच्या उत्पन्नाची तीन भागात विभागणी करतो. गरज, इच्छा आणि बचत या तीन गोष्टींचा यात समावेश आहे. हा नियम सांगतो की तुमच्या उत्पन्नातील ५०% भाडे, किराणा सामान आणि वाहतूक यासारख्या गरजांवर खर्च करणे आवश्यक आहे. त्याच वेळी ३० टक्के बाहेर खाणे, मनोरंजन आणि खरेदी यांसारख्या गरजांसाठी ठेवली पाहिजे. यानंतर, तुमच्या उत्पन्नातील २०% भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांसाठी गुंतवावी. १५*३०*२० चा नियम तुम्हाला तुमची बचत वाढवण्यास मदत करतो. आता तुम्ही तुमची बचत SIP मध्ये गुंतवू शकता. SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये खिशावर कोणताही भार पडत नाही आणि दीर्घ मुदतीत परतावाही खूप चांगला मिळतो. जर तुम्ही १५ वर्षे १५ टक्के व्याजाने दरमहा १५००० रुपये गुंतवले तर तुमची एकूण गुंतवणूक रु. २७ लाख होईल. तुम्हाला व्याज म्हणून ७३ लाख रुपये मिळतील. या कालावधीत तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम १,००,२७,६०१ रुपये असेल. जर तुम्ही हे १५ हजार रुपये ३० वर्षांसाठी गुंतवले तर तुम्ही १० कोटींहून अधिक मजबूत फंड बनवाल. तुमची गुंतवणूक फक्त ५४ लाख रुपये असेल.टॅग्स :गुंतवणूकInvestment