Investment: FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची चांदी, या बँका देताहेत ९ टक्क्यांहून अधिक व्याज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 01:50 PM2023-09-02T13:50:24+5:302023-09-02T14:08:02+5:30

Investment: मे २०२३ मध्ये अनेक बँकांनी एफडीवर व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी रेपो रेटमध्ये झालेल्या वाढीनंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदरामध्ये वाढ केली आहे. मात्र तरीही सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ९ टक्के व्याज देऊ शकलेले नाहीत. मात्र काही बँका अशा आहेत, ज्या ज्येष्ठ नागरिकांना ९ टक्क्यांहून अधिकचं व्याज देत आहेत.

मे २०२३ मध्ये अनेक बँकांनी एफडीवर व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी रेपो रेटमध्ये झालेल्या वाढीनंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदरामध्ये वाढ केली आहे. मात्र तरीही सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ९ टक्के व्याज देऊ शकलेले नाहीत. मात्र काही बँका अशा आहेत, ज्या ज्येष्ठ नागरिकांना ९ टक्क्यांहून अधिकचं व्याज देत आहेत.

यूनिटी स्मॉल फायनान्स बँक नागरिकांना एफडीवर ९ टक्के वार्षिक दराने व्याज देत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना ९.५० टक्के दराने व्याज देत आहे. बँकेकडून १००१ दिवसांच्या अवधीवर ९.५० टक्के व्याज दिले जात आहे. १८१ दिवसांपासून २०१ दिवसांपर्यंत एफडीवर ९.२५ टक्के व्याज दिलं जात आहे.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने एफडीच्या व्याज दरात वाढ करून तो ९.११ टक्के केला आहे. बँका सामान्य नागरिकांना तीन टक्के ते ८.५१ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. १०० दिवसांच्या अवधीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ३.६० टक्क्यांवरून ९.११ टक्क्यांपर्यत करण्यात आला आहे.

जन स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना ४.२५ ते ९ टक्के व्याज देत आहे. ९ टक्क्यांचा व्याजदर हा ३६६ ते ४९९ दिवस आणि ५०१ दिवसांपासून ते २ वर्षे आणि ५०० दिवसांच्या अवधीवर लागू आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने एफडीच्या व्याजदराला ९.६० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. बँक पाच वर्षांच्या अवधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना ४.५० टक्के ते ९.६० टक्के व्याज देत आहे. बँक ९९९ दिवसांच्या अवधीसाठी ९.५० टक्के आणि एक वर्षापासून दोन वर्षांपेक्षा अधिकच्या अवधीसाठी ९ टक्के व्याज प्रदान करत आहे.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना ८८८ दिवसांमध्ये मॅच्यअर होणाऱ्या एफडीवर ९ टक्के व्याजदर देत आहे. सामान्य नागरिकांसाठी एफडीवर व्याजदर हा ८.५ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. तो ८८८ दिवसांमध्ये मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर लागू होईल.

ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक सिनियर सिटिझनसाठी दोन वर्षांपासून तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ९ टक्के व्याजदर प्रदान करत आहे. तर सामान्य नागरिकांसाठी ८.५० टक्के व्याजदर देत आहे.