PNB MySalary Account : आता खातेधारकांना मिळणार २० लाखांपर्यंतचा विमा, गृहकर्जावरही सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 02:16 PM2021-03-10T14:16:21+5:302021-03-10T14:25:08+5:30

Punjab National Bank : पाहा कोण उघडू शकतं खातं, आणखी कोणत्या मिळणार सुविधा

गेल्या काही दिवसांपासून अनेक बँका आपल्या ग्राहकांसाठी गृहकर्जावरील व्याजात सूट देत आहेत. परंतु आता नोकरी करणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे.

जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचं सॅलरी अकाऊंटही नक्कीच असेल. सॅलरी अकाऊंटसह बँक अनेक सुविधा देत असते.

परंतु आता सॅलरी अकाऊंट असलेल्या ग्राहकांना पंजाब नॅशनल बँकेनं काही खास सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार PNB बँकेत सॅलरी अकाऊंट सुरू केल्यावर पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्ससह कंपनी ओव्हरड्राफ्ट आणि स्वीपचीही सुविधा देत आहे.

बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार PNB MySalary Account च्या ग्राहकांसाठी ३ लाख रूपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि त्यासोबतच २ लाख रूपयांपर्यंत अॅक्सिडेंटल कव्हरही देण्यात येणार आहे.

याशिवाय ग्राहकांना लोनवर डॉक्युमेंटेशन आणि प्रोसेसिंग फीमध्ये १०० टक्के सूटही मिळू शकते.

बँकेनं या अंतर्गत खातं सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सिल्वर, गोल्ड, प्रिमिअम आणि प्लॅटिनम या श्रेणींमध्ये विभागलं आहे.

पीएनबीच्या या खास सुविधेअंतर्गत केंद्र, राज्य सरकार, पीएसयू, शासकीय-निमशासकीय, एनएनसीज, मोठ्या संस्था, कॉर्पोरेट अथवा शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना हे खातं सुरू करता येईल.

सॅलरी अकाऊंटमध्ये कोणत्याही प्रकारची किमान रक्कम ठेवणं बंधनकारक नाही. तसंच हे खातं शून्य बॅलन्समध्येही सुरू करता येऊ शकतं.

बँकेनं सुरू केलेल्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही कॅलेंडर तिमाहीमध्ये सलग तीन महिने खात्यात वेतन येणं आवश्यक आहे.

ज्यांचं वेतन १ ते २५ हजार रूपयांच्यामध्ये आहे त्यांना सिल्वर श्रेणीचं खातं देण्यात येईल.

तर ज्यांचं वेतव २५ हजार रूपये ते ७५ हजारांच्या दरम्यान असेल त्यांना गोल्ड श्रेणीचं खातं देण्यात येईल.

७५ हजारांपासून १.५ लाखांपर्यंत मासिक वेतन असेल्यांना प्रिमिअम तर १.५ लाख किंवा त्यापेक्षा अधिक वेतन असलेल्यांना प्लॅटिनम श्रेणीतील खातं देण्यात येईल.

सिल्व्हर श्रेणीमध्ये ५० हजार, गोल्ड श्रेणीत १.५ लाख तक प्रिमिअम आणि प्लॅटिनम श्रेणीत अनुक्रमे २.२५ लाख ते ३ लाखांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा देण्यात येणार आहे.

बँक १८ लाख रूपयांचा इन्शुरन्स कव्हर उपलब्ध करून देणार आहे. तसंच २ लाख रूपयांचा इन्शुरन्स कव्हर डेबिट कार्ड वापरण्यावर मिळेल.

सर्वच श्रेणीच्या खात्यांवर २० लाख रूपयांचा पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर मिळणार आहे.

सिल्व्हर श्रेणीच्या कार्डासाठी रुपे क्लासिक, प्लॅटिनम कार्ड देण्यात येईल. तसंच यासाठी काही शुल्कही आकारलं जाईल. परंतु अन्य श्रेणीतील कार्डसाठी कोणत्याही प्रकारे शुल्क आकारलं जाणार नाही.

सिल्व्हर श्रेणी आणि गोल्ड श्रेणीतील खातेधारकांना गृह, कार किंवा पर्सनल लोन डॉक्युमेंटशन आणि प्रोसेसिंग चार्जमध्ये ५० टक्के सूट दिली जाईल.

तसंच प्रिमिअम आणि प्लॅटिनम श्रेणीतील खातेधारकांना १०० टक्के सूट मिळेल. पण यासाठी सलग तीन महिने खात्यात वेतनं येणं अनिवार्य आहे.

याव्यतिरिक्त जर ग्राहकांना क्रेडिट कार्ड हवं असेल तर त्यांना ते देण्यात येईल. क्रेडिट कार्ड इश्यूसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परंतु ग्राहकांना वार्षिक शुल्क मात्र द्यावं लागेल.