900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 05:43 PM2024-10-07T17:43:34+5:302024-10-07T17:49:44+5:30

यातील काही शेअर असे आहेत ज्यांनी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला...

कधीकाळी शेअर बाजारात खळबळ उडवून देणारे काही शेअर्स आज अत्यंत वाईट स्थितीतून जाताना दिसत आहेत. हे शेअर्स एप्रिल महिण्यापासून आतापर्यंत तब्बल 60 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. महत्वाचे म्हणजे, गेल्या आठवड्यातील मंदी वगळता शेअर बाजारात मजबूती दिसत असतानाही या शेअरची स्थिती अशीच दिसली.

यातील काही शेअर असे आहेत ज्यांनी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. यातील दोन शेअर्सनी तर 900 टक्क्यांपर्यंतही परतावा दिला आहे. मात्र या वर्षात एप्रिल महिन्यापासून या शअर्समध्ये घसरण दिसून आली आहे.

हे शेअर 60 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. यात व्होडाफोन आयडिया, ग्लोबल हेल्थ, क्यूपिड, जीव्हीके पॉवर अँड इंफ्रास्ट्रक्चर, संघवी मोटर्स, एचएलव्ही, सनफार्मा रिसर्च आदिंचा समावेश आहे.

अशी आहे स्थिती - लास्ट माईल एंटरप्रायझेस - या शेअरने 2023-24 मध्ये 937 टक्के एवढा परतावा दिला आहे. मात्र आता त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. गेल्या 4 महिन्यांत हा शेअर 40 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. सध्या कंपनीच्या शेअरची किंमत 495.25 रुपयांवर आहे. हा शेअर सोमवारी 5 टक्क्यांनी घसरला.

2. क्यूपिड लिमिटेड - या शेअरने गेल्या वर्षात 864 टक्क्यांचा परतावा देत आपल्या गुंतवणूकदारांना मालामालकेले. मात्र आता हे चित्र बदलले आहे. या शेअरने गेल्या 6 महिन्यांत सुमारे 35 टक्क्यांचा घाटा केला आहे. सध्या याची किंमत 80.40 रुपये आहे. हा शेअर सोमवारी सुमारे एक टक्क्यांने वाधारला.

3. GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर - या कंपनीच्या शेअरनेही गेल्या वर्षात खळबळ उडवून दिली होती. गेल्या वर्षात या शेअरने 373 टक्के परतावा दिला होता. मात्र आता गेल्या 6 महिन्यांत यात सुमारे 35 टक्क्यांनी घट झाली आहे. याची किंमत सुमारे 6 रुपये आहे. सोमवारी हा शेअर सुमारे दोन टक्क्यांची घसरला.

4. जयप्रकाश असोसिएट्स - या शेअरने गेल्या वर्षात सुमारे 160 टक्के परतावा दिला होता. मात्र आता गेल्या 6 महिन्यांत 60 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. हा शेअर सध्या 7.77 रुपयांवर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत यात पुन्हा तेजी दिसू लागली आहे. सोमवारी त्यात 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले.

5. व्होडाफोन आयडिया - या कंपनीच्या शेअर्समध्येही गेल्या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 127 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला होता. मात्र गेल्या 6 महिन्यांत याचे चित्रही बदलले आहे. 6 महिन्यांत या शअरने 25 टक्क्यांचा घाटा दिला आहे. सध्या या शेअरची किंमत 9.15 रुपये आहे. सोमवारीही त्यात ७ टक्क्यांनी घट झाली.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)