Investment Tips: ₹३०,००० पगार मिळतोय? अशी करा गुंतवणूक, काही वर्षांत तयार होईल १ कोटींचा फंड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 09:13 AM2024-06-27T09:13:34+5:302024-06-27T09:23:44+5:30

Investment Tips: आजकाल बरेज जण गुंतवणूकीकडे वळत आहे. परंतु गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळण्यासाठी त्यात सातत्य असणं गरजेचं आहे. परंतु जर तुम्ही गुंतवणूकीत सातत्य ठेवलं तर तुम्ही कमी गुंतवणूकीतही कोट्यवधींचा फंड जमा करू शकता.

Investment Tips: आजकाल बरेज जण गुंतवणूकीकडे वळत आहे. परंतु गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळण्यासाठी त्यात सातत्य असणं गरजेचं आहे. परंतु जर तुम्ही गुंतवणूकीत सातत्य ठेवलं तर तुम्ही कमी गुंतवणूकीतही कोट्यवधींचा फंड जमा करू शकता. आर्थिक नियोजन योग्य दिशेनं केलं तर तुम्ही २५-३० हजारही महिन्याला कमावत असाल तरी तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.

आजच्या काळात गुंतवणुकीची अशी अनेक माध्यमे आहेत, ज्याच्या माध्यमातून कमी पगार असेल तरीही कोट्यधीश होण्याचं स्वप्न साकार करू शकतात. म्युच्युअल फंड एसआयपी हे त्यापैकीच एक. ३० हजार रुपये महिन्याला कमावणारी व्यक्तीही कशी कोट्यधीश होऊ शकते, आपण जाणून घेऊ.

Mutual Fund एसआयपी ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे, त्यामुळे त्यात परताव्याची हमी नाही. पण थेट शेअरमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा जोखीम कमी असते. दीर्घ मुदतीत सरासरी परतावा १२ टक्क्यांच्या जवळपास मिळू शकतो. जो इतर कोणत्याही योजनेपेक्षा बराच जास्त आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

काही वेळा यापेक्षा चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. कंपाउंडिंगमुळे म्युच्युअल फंडातील पैसा दीर्घ मुदतीत झपाट्यानं वाढतो. त्यामुळे आजच्या काळात लोक हा फायद्याचा सौदा मानतात आणि बहुतेक तज्ञ त्याचा पोर्टफोलिओमध्ये समावेश करण्याचा सल्ला देतात.

आता या मुद्द्यावर बोलायचं झालं तर तुम्ही ३० हजार पगार घेत असाल तर कोट्यधीश कसे होऊ शकता? याचं उत्तर असं आहे की, यासाठी तुम्हाला ५०-३०-२० चा नियम पाळावा लागेल आणि आपल्या कमाईतील २० टक्के रक्कम एसआयपीमध्ये गुंतवावी लागेल. ३०,००० पैकी २० टक्के रक्कम ६,००० रुपये असेल. जर तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा ६,००० रुपये गुंतवले तर २४ वर्षात तुम्ही कोट्यधीश व्हाल.

अशा तऱ्हेने २४ वर्षात तुम्ही एकूण १७,२८,००० रुपयांची गुंतवणूक कराल. १२ टक्के दरानं ८३,०८,१२३ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे २४ वर्षात तुम्ही १,००,३६,१२३ रुपयांचे मालक व्हाल. कालांतरानं तुमचं उत्पन्नही वाढेल, त्यानुसार तुम्ही ही त्यात तुमची गुंतवणूक वाढवू शकता आणि २४ वर्षापूर्वीच कोट्यधीश बनू शकता.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)