Investment Tips: पोस्टातील ही गुंतवणूक ठरेल अधिक फायद्याची; बँकांपेक्षा १ टक्के अधिकचे व्याज...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 10:07 AM2022-10-13T10:07:43+5:302022-10-13T10:16:04+5:30

पोस्ट ऑफिसच्या अनेक अल्प बचत योजनांच्या व्याजदरात केंद्र सरकारकडून सुधारणा करण्यात आली आहे

पोस्ट ऑफिसच्या अनेक अल्प बचत योजनांच्या व्याजदरात केंद्र सरकारकडून सुधारणा करण्यात आली आहे. त्यात किसान विकास पत्राचा (केव्हीपी) समावेश आहे. किसान विकास पत्र योजनेतील गुंतवणुकीवर आता ६.९ टक्क्यांऐवजी ७ टक्के व्याज मिळेल. बहुतांश मोठ्या बँका मुदत ठेवींवर ६ टक्क्यांच्या आसपास व्याज देतात. त्यामुळे केव्हीपी योजनेत पैसे गुंतवणे फायदेशीर ठरणार आहे.

किसान विकास पत्राचे खाते हस्तांतरणीय आहे. याचे प्रमाणपत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येते. इतकेच नव्हे, तर एका पोस्टातून दुसऱ्या पोस्ट कार्यालयातही त्याचे हस्तांतरण करता येते. यात संयुक्त खाते उघडण्याची सोय आहे.

किसान विकास पत्रात गुंतवणूक करण्यासाठी वय १८ वर्षे पूर्ण असायला हवे. अल्पवयीन मुलेही या योजनेत सहभागी होऊ शकतात; मात्र अल्पवयीनांच्या खात्याची देखरेख त्याच्या पालकास करावी लागते.

किसान विकास पत्राचा लॉक इन कालावधी अडीच वर्षांचा (३० महिने) असतो. म्हणजे एकदा गुंतवणूक केल्यानंतर अडीच वर्षे पैसे काढता येत नाहीत.

तुम्ही किसान विकास पत्रात गुंतवणूक केल्यास ७ टक्के वार्षिक व्याज दराने तुमचे पैसे १० वर्षे व ३ महिन्यांत म्हणजेच १२४ महिन्यांत दुप्पट होतात.

किसान विकास पत्रात गुंतवणुकीनंतर गुंतवणूकदारास एक प्रमाणपत्र मिळते. त्याचे स्वरूप बाँडसारखे असते. ते कोणीही खरेदी करू शकते. यात गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. किमान गुंतवणूक १ हजार रुपये आवश्यक असते.

१०० रुपयांच्या पटीत कितीही गुंतवणूक किसान विकास पत्रात करता येते. देशभरातील पोस्ट कार्यालयातून ते खरेदी करता येते. पोस्ट ऑफिस यास बाँडसारखेच जारी करते. त्यावर निश्चित दराने व्याज मिळते.

किसान विकास पत्राचा लॉक इन कालावधी अडीच वर्षांचा (३० महिने) असतो. म्हणजे एकदा गुंतवणूक केल्यानंतर अडीच वर्षे पैसे काढता येत नाहीत.

तुम्ही किसान विकास पत्रात गुंतवणूक केल्यास ७ टक्के वार्षिक व्याज दराने तुमचे पैसे १० वर्षे व ३ महिन्यांत म्हणजेच १२४ महिन्यांत दुप्पट होतात.