Investment Tips : PPF मध्ये दीड लाखांची गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते २ कोटी, असं करावं लागेल प्लॅनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 02:10 PM2022-08-23T14:10:11+5:302022-08-23T14:16:17+5:30

Investment Tips : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF हे गुंतवणुकीचे असे साधन आहे ज्यामध्ये कमी पैसे जमा करूनही मोठी रक्कम उभी केली जाऊ शकते.

Investment Tips : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF हे गुंतवणुकीचे असे साधन आहे ज्यामध्ये कमी पैसे जमा करूनही मोठी रक्कम उभी केली जाऊ शकते. परंतु यातील दीर्घ काळाची गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. पीपीएफमधील गुंतवणूक ही टॅक्स फ्री असते. यासाठीच ही एक मोठी बचतही आहे. पीपीएफमध्ये योग्यप्रकारे गुंतवणूक केली तर तुम्ही सहजरित्या २ कोटींपर्यंत रक्कम जमवू शकता. तुम्ही पीपीएफमध्ये किती रक्कम गुंतवता यावर तुम्हाला मिळणारी रक्कम अवलंबून असते.

पीपीएफ वार्षिक ७.१ टक्क्याचे गॅरंटीड रिटर्न देते. यासाठी यामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे बुडण्याची शक्यता नसते. यात अखेरिस मिळणारी रक्कम टॅक्स फ्री असते. यात गुंतवणूकीची रक्कम आणि रिटर्न मिळणारी रक्कम टॅक्स फ्री आहे. दरवर्षी ४६,८०० रूपयांची गुंतवणूक ही टॅक्स फ्री असते.

याचाच अर्थ जर तुम्ही वर्षाला इतके पैसे जमा करा आणि त्याची संपूर्ण रकमेवर टॅक्स डिडक्शन क्लेम करा. जे लोक ३० चक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये येतात, त्यांनाच ४६,८०० रूपयांच्या टॅक्स डिडक्शनचा लाभ मिळतो. अन्य लोकांना त्यांच्या टॅक्स स्लॅबवर ही सूट अवलंबून असेल.

पीपीएफ अकाऊंट कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उघडू शकता. पीपीएफ अकाऊंटमध्ये किमान ५०० रूपये आणि कमाल दीड लाखांपर्यंत रक्कम जमा करू शकता. पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटीचा कालावधी १५ वर्षांचा आहे. त्यानंतरही याचा कालावधी वाढवता येतो. परंतु तो पाच पाच वर्षांच्याच कालावधीसाठी वाढवता येऊ शकतो.

जर तुम्ही २५ व्या वर्षापासून पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर ६० व्या वर्षापर्यंत तुम्ही सहजरित्या २.२६ कोटी रूपये जमवू शकता. परंतु या स्कीममध्ये अधिकाधिक पैसे जमा कराल याची खात्री करावी लागेल. जर १.५ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर वर्षाच्या अखेरिस तुमच्या खात्यात १०,६५० रूपये जमा होईल.

पुढील वर्ष आणखी दीड लाखांची गुंतवणूक केली तर खात्यात आणखी २२,०५६ रूपये जमा होती. अशा प्रकारे १५ वर्षे गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटी कालावधीपर्यंत ४०,६८,२०९ रूपये जमतील. यामध्ये २२.५ लाखांची गुंतवणूक आणि १८,१८,२०९ रूपयांचं व्याज असेल. (टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)