Investment Tips : PPF की फिक्स्ड डिपॉझिट, उत्तम रिटर्न्ससाठी कुठे करावी गुंतवणूक? इथे मिळेल उत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 10:42 AM 2023-01-22T10:42:47+5:30 2023-01-22T10:52:22+5:30
फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हे भारतातील दोन सर्वात लोकप्रिय गुंतवणूकीचे पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायांमध्ये अनेक फायदे आणि वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हे भारतातील दोन सर्वात लोकप्रिय गुंतवणूकीचे पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायांमध्ये अनेक फायदे आणि वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. दोन्ही योजनांमध्ये धोका खूप कमी आहे. याशिवाय एफडी किंवा पीपीएफ खाते उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या या तिमाहीसाठी व्याज दर ७.१ टक्के आहे. दुसरीकडे, फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD स्कीममध्ये, सामान्य श्रेणीसाठी व्याजदर ३ टक्क्यांपासून ७ टक्क्यांपर्यंत सुरू होतात.
याशिवाय पीपीएफमध्ये जॉईंट खाते उघडण्याची परवानगी नाही. तर, एफडी योजनेत जॉईंट खाते उघडता येते. भारतात राहणारे लोक पीपीएफ योजनेत गुंतवणूक करू शकतात.
तर, अनिवासी भारतीय (NRI), कंपन्या, ट्रस्ट, हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली (HUF) आणि रहिवासी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करू शकतात. जेथे PPF मध्ये गुंतवणुकीचा कालावधी १५ वर्षे आहे. त्याच वेळी, एफडी योजनेत ७ वर्ष ते २० वर्षांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.
पीपीएफमध्ये लिक्विडीटी कमी आहे. त्याच वेळी, एफडीमधील लिक्विडीटी पीपीएफपेक्षा चांगली आहे. PPF मध्ये किमान ५०० रुपये गुंतवले जाऊ शकतात. त्याच वेळी, एफडीमध्ये किमान गुंतवणूक १०० ते १ हजार रुपयांपर्यंत असते. पीपीएफमध्ये एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. त्याच वेळी, FD मध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.
टॅक्स बेनिफिट्सबद्दल बोलायचं झाल्यास, पीपीएफ योजनेतील गुंतवणुकीवर पूर्णपणे टॅक्समध्ये सूट असते. तर, एफडीमध्ये १.५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कराच्या सवलतीचा फायदा मिळू शकतो.