Investment Tips : उत्तम रिटर्न्स मिळवायचेत?, पाहा गुंतवणूक नेमकी कुठे करावी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 12:42 PM2022-07-14T12:42:11+5:302022-07-14T12:49:01+5:30

काही वेळा घाईगडबडीत, विचार न करता आपण कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करतो. यामुळे नंतर त्यातून आपल्याला अधिक रिटर्न मिळत नाहीत.

गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. काही वेळा घाईगडबडीत, विचार न करता आपण कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करतो. यामुळे नंतर त्यातून आपल्याला अधिक रिटर्न मिळत नाहीत. उत्तम रिटर्न मिळवण्यासाठी कोणत्या ठिकाणी गुंतवणूक फायदेशीर ठरते ते पाहू...

किती हवा परतावा? - किमान ५ टक्के वास्तविक परतावा देणाऱ्या मालमत्तांमध्येच गुंतवणूक करायला हवी. महागाई समायोजित केल्यानंतर जो परतावा उरेल तो ५ टक्के असायला हवा. अशा ज्या मालमत्ता आहेत, त्यांच्यातच गुंतवणूक करणे लाभदायक आहे.

तज्ज्ञांच्या मते कुठे गुंतवणूक कराल? ३०% इक्विटी, ३०% डेट, २०% गोल्ड, २०% रिअल इस्टेट.

शेअर बाजारात गुंतवणूक करणे कधीही फायदेशीर ठरते. मात्र, बाजार कोसळतोय म्हणून त्यातू्न गुंतवणूक काढून घेणे कधीही धोकादायक. असे करणे टाळावे. दीर्घ अवधीसाठी समभागात गुंतवणूक करायला हवी. इंट्राडे ट्रेडिंगपासून गुंतवणूकदारांनी शक्यतो दूरच राहायला हवे. समभागांची निवड करण्यासाठी ‘पॅसिव्ह’ ऐवजी ‘ॲक्टिव्ह’ दृष्टिकोन ठेवावा.

बचत योजना, खात्रीशीर गुंतवणूक - पोस्ट खात्याच्या अनेक बचत योजना आहेत, ज्यामध्ये उत्तम रिटर्न मिळतात. खात्रीशीर गुंतवणूक म्हणून याकडे पहायला हवे. या योजनांमध्ये काही प्रमाणात गुंतवणूक नक्की असावी. यात प्राप्तिकरातून सवलतही मिळते.

पोस्ट खात्याच्या पीपीएफमध्ये ७.१ टक्के व्याजदराने परतावा मिळतो. यातील गुंतवणूक १५ वर्षांपर्यंत ठेवणे बंधनकारक असल्याने १५ वर्षांनंतर मोठी रक्कम हातात येते, याचा फायदा मुलांचे शिक्षण किंवा उद्योग सुरू करण्यासाठीही होऊ शकतो.

पोर्टफोलिओला ट्रॅक कधी करावे? - प्रत्येक तीन महिन्यांनी आपली गुंतवणूक योग्य मार्गाने आहे का, चांगला परतावा मिळतोय का, गुंतवणूक केलेल्या कंपनीची स्थिती कशी आहे याचा अभ्यास करावा. यात तुमच्या गुंतवणुकीच्या मार्गातील अडथळेही दूर करता येतील.