Investment: श्रीमंत बनायचंय? मग या पाच ठिकाणी करा गुंतवणूक, कमी वेळात मिळेल बंपर रिटर्न By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 04:09 PM 2022-09-19T16:09:02+5:30 2022-09-19T17:28:04+5:30
Investment Tips: जर तुम्हीही वेगवेळ्या ठिकाणी गुंतवणूक करून कमी वेळामध्ये चांगला रिटर्न मिळवण्यासाठी इच्छुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्याबाबतच्या काही चांगल्या पर्यायांबाबत सांगणार आहोत, जिथून उत्तम रिटर्नसह तुम्हाला टॅक्समध्येही सवलत मिळेल. जर तुम्हीही वेगवेळ्या ठिकाणी गुंतवणूक करून कमी वेळामध्ये चांगला रिटर्न मिळवण्यासाठी इच्छुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्याबाबतच्या काही चांगल्या पर्यायांबाबत सांगणार आहोत, जिथून उत्तम रिटर्नसह तुम्हाला टॅक्समध्येही सवलत मिळेल.
एसबीआय म्युच्युअल फंडाकडून १०० पेक्षा अधिक म्युच्युअल फंड स्कीम चालवल्या जातात. ही देशातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी आहे. म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही शेअर बाजारामध्येच नाही तर डेट, गोल्ड आणि कमोडिटीमध्ये गुंतवणूक करू शकता.
जर तुम्हाला पाच वर्षे, १० वर्षे किंवा यापेक्षा अधिक वेळासाठी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी अनेक म्युच्युअल फंड आहेत. तुम्ही छोट्या काळासाठी डेट फंड किंवा लिक्वीड फंड सिलेक्ट करू शकता. दीर्घकालावधीसाठी इक्व्हिटी म्युच्युअल फंड योग्य ठरतील.
ईपीएफओ गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. जर तुम्ही कुठल्याही कंपनीचे कर्मचारी असाल तर तुम्हाला वेतनामधील एक भाग ईपीएफओमध्ये योगदान द्यावे लागेल. जेवढी रक्कम तुम्ही जमा कराल, तेवढंच योगदान कंपनीकडून दिलं जातं. ईपीएफओमधील रकमेवर दरवर्षी व्याज मिळते.
गुंतवणुकीसाठी सोने हा सुद्धा विश्वासार्ह पर्याय आहे. सोन्यामध्ये गुंतवणुकीसाठी पेपर गोल्ड, गोल्ड इटीएफ, सॉवरेन गोल्ड बाँड, गोल्ड म्युच्युअल फंड आणि डिजिटल गोल्डला उत्तम पर्याय म्हणून निवडू शकता. या सर्व माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक करणे आणि विकणे सोपे पडते.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (पीओएमआयएस) ही सुद्धा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. सुरक्षित गुंतवणूक असलेल्या या योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला फिक्स उत्पन्न मिळते. त्यावर रिटर्नच्या हमीसह निश्चित व्याजामुळे तुमचे उत्पन्न वाढते. यामध्ये तुम्ही १५०० रुपयांपासून ४.५ रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. जॉईंट अकाऊंटमध्ये तुम्ही कमाल ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
पीपीएफ एक दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना आहे. त्यासाठी तुम्ही जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ अकाऊंट उघडू शकता. त्याची १५ वर्षांत मॅच्युरिटी होते. या अकाऊंटमध्ये दर आर्थिक वर्षामध्ये किमान ५०० रुपये आणि कमाल दीड लाख रुपये जमा करता येतात.