Investment FD, IPO : एफडी नाही, आता आयपीओवर अधिक भरवसा; दिवाळीनंतर डिपॉझिटमध्ये २४ वर्षांतील सर्वात मोठी घरसण By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 01:46 PM 2021-12-05T13:46:22+5:30 2021-12-05T14:06:01+5:30
Investment FD, IPO : सामान्यत: फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणूकीचा सुरक्षित आणि फायद्याचा पर्याय मानला जातो. परंतु गेल्या काही वर्षांत याकडे वळणाऱ्यांची संख्या होतेय कमी. Investment FD, IPO : सामान्यत: फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणूकीचा सुरक्षित आणि फायद्याचा पर्याय मानला जातो. परंतु गेल्या काही वर्षांत याकडे वळणाऱ्यांची ग्राहकांची संख्या कमी होताना दिसत आहे.
दरम्यान, आता गुंतवणूकदार एफडीचा पर्याय म्हणून IPO कडे पाहताना दिसतायत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालातूनही याला दुजोरा मिळताना दिसत आहे.
एसबीआयच्या (SBI) रिपोर्टनुसार दिवाळीनंतर बँकेत जमा असलेल्या रकमेत म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटमध्ये २.७ लाख कोटी रुपयांची मोठी घसरण झाली आहे. ५ ते १९ नोव्हेंबर या कालावाधीत जमा रकमेत झालेली घरसण ही १९९७ नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. यावेळी झालेली ही २४ वर्षांतील सर्वात मोठी घसरण आहे.
५ ते १९ नोव्हेंबर या कालावधीदरम्यान, पेटीएम, लेटेंट व्ह्यू, टार्सन, सफायर आणि सिगाची सारखे आयपीओ लाँच करण्यात आले. पेटीएमच्या आयपीओनं ग्राहकांना मोठा झटका दिला होता. परंतु अन्य काही आयपीओंनी ग्राहकांना मालामाल केलं होतं.
दसऱ्यानंतर आणि दिवाळीपूर्वी डिपॉझिटच्या आकड्यानंही आश्चर्याचा धक्का दिला. ५ नोव्हेंबर २०२१ संपलेल्या पंधरवड्यात बँकांमध्ये जमा रकमेत ३.३ लाख कोटी रुपयांची मोठी वाढ दिसून आली.
३.३ कोटी रुपयांची झालेली वाढ ही गेल्या २४ वर्षांमधील सर्वात मोठी पाचवी वाढ आहे. २५ नोव्हेंबर २०१६ मध्ये संपलेल्या पंधरवड्यात नोटबंदीनंतर ४.१६ लाख कोटी रुपये जमा करण्यात आले होते.
याशिवाय २६ सप्टेंबर २०१६ रोजी संपलेल्या पंधरवड्यात ३.५५ लाख कोटी, २९ मार्च २०१९ मध्ये संपलेल्या पंधरवड्यात ३.४६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली होती. तर एप्रिल २०१६ मध्ये संपलेल्या पंधरवड्यात ३.४१ लाख कोटी रुपये जमा करण्यात आले होते.