IRCTC Credit Card : रेल्वेनं लॉन्च केलं क्रेडिट कार्ड! आता स्वस्त तिकिटासह मिळणार 'हे' जबरदस्त फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 09:28 AM2022-02-22T09:28:26+5:302022-02-22T09:35:45+5:30

ग्राहकांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, ग्राहक या क्रेडिट कार्डचा वापर इंधन आणि किराणा सामानाबरोबरच, इतर गोष्टींच्या खरेदीसाठीही करू शकतात.

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेच्या केटरिंग आणि तिकीट युनिट (IRCTC)ने आपल्या यूजर्ससाठी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड (Co-Branded Credit Card) लॉन्च केले आहे. हे NPCI आणि BOB फायनांशियल सोल्यूशंससह एकत्रितपणे लॉन्च करण्यात आले आहे. या कार्डमुळे प्रवाशांना अनेक सुविधा मिळतील. IRCTC च्या वेबसाइटवर रोजच्या रोज 6 कोटीहून अधिक यूजर्स रेल्वे तिकिट बुक करतात. (IRCTC Co-Branded Credit Card)

आयआरसीटीसीने दिली माहिती - आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, IRCTC BOB रुपे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्डमुळे (IRCTC BoB RuPay Contactless Credit), भारतीय रेल्वेने नियमित प्रवास करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होईल. महत्वाचे म्हणजे, अशा प्रवाशांसाठीच हे कार्ड तयार करण्यात आले आहे. BOB फायनांशियल सोल्यूशंस लिमिटेड (BFSL) ही बँक ऑफ बडोदा (BOB) च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. या क्रेडिट कार्डपासून ग्राहकांना कोण-कोणत्या सुविधा अथवा फायदे मिळणार, जाणून घ्या...-

- ग्राहकांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, ग्राहक या क्रेडिट कार्डचा वापर इंधन आणि किराणा सामानाबरोबरच, इतर गोष्टींच्या खरेदीसाठीही करू शकतात.

- या कार्डचा उपयोग JCB नेटवर्कच्या माध्यमाने इंटरनॅशनल मर्चेंट्स आणि एटीएममध्ये देवाण-घेवाण करण्यासाठीही होऊ शकतो.

- या क्रेडिट कार्डच्या मदतीने IRCTC वेबसाइट अथवा मोबाइल अॅपच्या माध्यमाने 1AC, 2AC, 3AC, CC, किंवा EC बुकिंग करणाऱ्या यूजर्सना 40 रिवॉर्ड पॉइंट (per Rs 100 spent) सारखा बेनिफिटही मिळतो.

- याशिवाय हे कार्ड सर्व प्रकारच्या ट्रेन तिकिट बुकिंगवर 1 टक्के ट्रांझेक्शन शुल्क सूटही ऑफर करते.

- याशिवाय, कार्ड जारी झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत 1,000 रुपये अथवा त्याहून अधिकची सिंगल खरेदी करणाऱ्यांना 1,000 बोनस रिवॉर्ड पॉइंट्सदेखील मिळतील.

- या कार्डचा वापर केल्यास किराना आणि डिपार्टमेंटल स्टोर्सवर चार रिवॉर्ड पॉइंट (per Rs 100 spent) आणि इतर कॅटेगिरीवर दोन रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.

- कार्डधारकांना दरवर्षी चार वेळा रेल्वे लाउंजची मोफत व्हिजिटही करता येईल. याशिवाय, याद्वारे ग्राहकांना भारतातील सर्व पेट्रोल पंपांवर एक टक्का ईंधन सरचार्जमधून सूटही मिळेल.