Iron Rod Price: स्वप्नातील घर बांधण्यासाठी योग्य टायमिंग! लोखंडी सळ्यांचा दर निम्म्यावर कोसळला By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 02:10 PM 2022-07-27T14:10:41+5:30 2022-07-27T14:19:28+5:30
Home Construction: बांधण्यासाठी दगड, विटा, सिमेंट अशा वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. मार्च, एप्रिल, मे मध्ये तर यांचे दर हाय असतातच पण पावसाने ओढ दिल्याने ते जूनमध्येही चढेच होते. जवळपास दीड महिन्यांपर्यंत लोखंडी सळ्यांचे दर गगनाला भिडले होते, काही ठिकाणी तर ते लाखाला एक टन एवढ्या पातळीपर्यंत गेले होते. आता हेच दर पन्नास हजारांखाली आले आहेत. घर बांधण्यासाठी दगड, विटा, सिमेंट अशा वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. याच्याही किंमती कमी झाल्या आहेत. यामुळे तुमच्या स्वप्नातील घर बांधण्याची ही योग्य वेळ आहे.
घर बांधताना लोखंडी सळ्या खूप महत्वाच्या भूमिका बजावतात. पिलर, स्लॅबला मजबुती आणण्यासाठी सळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. गेल्या दोन आठवड्यांत विविध शहरांमधील लोखंडी सळ्यांचे दर 4,500 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.
घर बांधण्यासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंच्या किंमती मार्च- एप्रिलमध्ये वाढल्या होत्या. परंतू आता हे दर जवळपास निम्म्याने कमी झाले आहेत. पावसाळा सुरु होणार असल्याचा जेव्हा अंदाज आला तेव्हा देखील या वस्तूंचे दर वाढू लागले होते. मात्र, आता पावसाळा सुरु झाल्याने हे दर धाडकन खाली कोसळले आहेत.
सिमेंट, वाळू, विटांचे दर कमी झाले आहेत. मार्च महिन्यात काही ठिकाणी सळ्यांची किंमत 85 हजार रुपये प्रति टनापर्यंत पोहोचली होती. आता याच सळ्या 47,300 रुपये ते 5,8000 रुपये प्रति टन या किमतीत उपलब्ध आहेत.
जूनच्या पहिल्या आठवड्यात तर हाच दर 44 हजार रुपयांपर्यंत खाली आला होता. परंतू, पावसाने ओढ दिल्याने हे दर पुन्हा वाढू लागले होते. ज्यांची कामे रखडलेली त्यांनी झपाट्याने कामे केल्याने या वस्तूंच्या किंमती वाढल्या होत्या.
शहरांनुसार 47,300 रुपये ते 58,000 रुपये प्रति टन असा दर झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांत 4,500 रुपयांपर्यंत दर कमी झाले आहेत. कानपूरमध्ये सर्वाधिक म्हणजेच 58,000 रुपये दर आहे. Ironmart वेबसाइटने हे दर दिले आहेत.
यानुसार नागपूरमध्ये 56,000 रुपयांवर असलेला दर 52,300 रुपयांवर आला आहे. नागपूरमध्ये 3,700 रुपयांनी दर कोसळले आहेत. गोव्यात 57,600 रुपयांवर असलेले दर 54,800 वर आले आहेत. 2,800 रुपयांनी दर कमी झाले आहेत.
महाराष्ट्रातील आणखी एक शहर जालन्यामध्ये 56,500 रुपयांवर असलेले दर 54,000 रुपयांवर आले आहेत. तर मुंबईत 55,700 रुपयांवर असलेले लोखंडी सळ्यांचे दर 52,600 रुपयांवर आले आहेत. मुंबईत 3,100 रुपयांनी दर उतरले आहेत.