दोन दिवसांत दाखल करा ITR, अन्यथा 31 जुलैनंतर जुन्या टॅक्स स्लॅबचे दरवाजे होतील बंद! By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 06:46 PM 2024-07-29T18:46:15+5:30 2024-07-29T18:48:55+5:30
ITR Filing : करदात्यांना त्यांचा ITR भरण्यासाठी फक्त दोन दिवसांचा वेळ शिल्लक आहे. ITR Filing : तुम्ही अद्याप तुमचा आयकर (Income Tax) भरलेला नसेल, तर तुमच्याकडे आता फक्त दोन दिवसांचा वेळ शिल्लक आहे. तुम्ही यात निष्काळजीपणा केला आणि 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नाही, तर तुम्हाला 1 ऑगस्टपासून दोन अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 31 जुलैनंतर आयकर भरल्यास दंड आकारला जातो. परंतु दंडापेक्षा एक असा नियम आहे, ज्यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
तुम्ही 31 जुलैपर्यंत ITR फाइल केला, तर टॅक्स स्लॅब निवडण्यासाठी दोन पर्याय मिळतात. म्हणजे, 31 जुलैपूर्वी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, जुना टॅक्स स्लॅब किंवा नवीन टॅक्स स्लॅब निवडू सकता. मात्र, ज्यांनी दिलेल्या वेळेनंतर आयकर रिटर्न भरला, त्यांना जुना टॅक्स स्लॅब निवडण्याचा पर्याच मिळत नाही. तुम्ही भाड्याने राहत असाल किंवा गृहकर्ज घेतले असेल. तुम्हाला वजावटीचा फायदा घेऊन जुन्या कर प्रणालीअंतर्गत आयकर वाचवायचा असेल, तर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही 31 जुलैपर्यंत आयटीआर भरला पाहिजे.
शेवटच्या तारखेनंतर ITR दाखल केला, तर त्याला विलंबित ITR म्हणतात. अनेक करदात्यांनी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख वाढवण्याची मागणी केली आहे, परंतु अद्याप सरकारकडून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.
किती दंड आकारला जातो?-31 जुलैनंतर आयटीआर फाइलिंगवर विलंब शुल्क भरावे लागते. जर तुमचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला ITR भरताना 1000 रुपये दंड भरावा लागेल. जर तुमचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला 5000 रुपये दंड भरावा लागेल. त्यामुळेच तुम्ही 31 जुलैपर्यंत ITR भरुन हा दंड टाळू शकता.
चुका सुधारू शकता- जर तुम्ही 31 जुलैपर्यंत रिटर्न फाइल केला आणि रिटर्नमध्ये चूक झाली असेल किंवा कोणतीही माहिती बदलायची असेल, तर तुम्ही सुधारित रिटर्न दाखल करू शकता. सुधारित विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. तुम्ही या तारखेपर्यंत कितीही वेळा सुधारित रिटर्न फाइल करू शकता. सुधारित विवरणपत्र भरण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही.