PAN-Aadhaar लिंकपासून ITR फायलिंगपर्यंत, या महिन्यात पूर्ण करा ही ५ कामं; अन्यथा होणार मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 01:01 PM2022-03-02T13:01:17+5:302022-03-02T13:11:24+5:30

ही महत्त्वाची कामं तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायला हवी, अन्यथा बसू शकतो मोठा फटका.

मार्च हा केवळ आर्थिक वर्षाचा शेवट नाही, तर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी देण्यात आलेल्या डेडलाईन्सचाही अखेरचाही महिना आहे. यामुळे तुम्हाला काही कामं ३१ मार्चपूर्वीच पूर्ण करणं गरजेचं आहे. या महिन्यात आयटीआर, पॅन आधार लिक (PAN Aadhaar Link), बँक अकाऊंट केव्हायसी (Bank Account KYC) देण्याचेही अखेरचे दिवस आहेत.

दरम्यान, ही कामं वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे. तसंच ही काम डेडलाईनच्या आधी केली नाहीत, तर मोठं नुकसानही सोसावं लागेल. आम्ही तुम्हाला अशी पाच महत्त्वाची काम सांगत आहोत जी तुम्हाला या महिन्याच्या आत पूर्ण करणं गरजेचं आहे.

पॅन कार्ड (पॅन) आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. ही दोन महत्त्वाची कागदपत्रे जोडली गेली नाहीत, तर पॅन कार्ड निष्क्रिय किंवा निरुपयोगी होईल, असे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

सरकारने ३१ मार्च २०२२ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. जर ३१ मार्चपर्यंत आधार आणि पॅन लिंक केले नाही तर आयकर कायद्याच्या कलम २७२ बी अंतर्गत १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.

असेसमेंट इयर २०२१-२२ साठी विलंब झालेले ITR दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. म्हणून, दिलेल्या देय तारखेपर्यंत आयटीआर भरण्यास चुकलेल्या अर्जदारांना, आयटीआर भरण्यासाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत आयकर रिटर्न भरण्याचा सल्ला दिला जातो.

त्याचप्रमाणे, आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी विलंब झालेल्या किंवा सुधारित ITR दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२१ आहे. जरी एखाद्या व्यक्तीने आपला ITR उशीरा ई-फाइल केला असेल, तरीही तो ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी रिवाइज केला जाऊ शकतो.

RBI ने KYC अपडेटची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवली आहे. अंतिम मुदतीपूर्वी केव्हायसी न केल्यास तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. KYC केवळ बँकिंगमध्येच नाही तर पैशांच्या व्यवहारांशी संबंधित सर्व सेवा आणि आवश्यक सेवांमध्ये आवश्यक आहे.

कमावत्या व्यक्तीसाठी कर बचतीचे काम पूर्ण करण्यासाठी फक्त एक महिना शिल्लक आहे. कर वाचवण्यासाठी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY), ELSS म्युच्युअल फंडांमध्ये पैसे जमा करा. जर असं शक्य नसेल तर मुलांची ट्युशन फी, होमलोन यासारख्या काही गोष्टी करदात्यांना लाभ मिळवून देतात.

आयकर कायद्याच्या कलम २०८ नुसार, ज्या करदात्याची टॅक्स लायबलिटी १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक आहे, तो अॅडव्हान्स टॅक्स भरू शकतो. प्रत्येक आर्थिक वर्षातील पहिला हप्ता १५ जून, दुसरा १५ सप्टेंबर, तिसरा १५ डिसेंबर आणि चौथा हप्ता १५ मार्च ही अंतिम मुदत आहे. म्हणून, ज्या करदात्यांनी मागील तिमाहीत आगाऊ कर हप्ते भरले आहेत त्यांना त्यांचा शेवटचा हप्ता भरण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२२ आहे.