84 दिवसांपर्यंत रिचार्ज करण्याची गरज नाही; Jio, Airtel, VI आणि BSNL चे शानदार प्लॅन By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 05:03 PM 2024-07-29T17:03:20+5:30 2024-07-29T17:13:03+5:30
recharge plan : अशा रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घ्या, ज्यामध्ये युजर्सना दररोज 1.5 GB डेटा आणि 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. भारतात Jio, Airtel, VI आणि BSNL या चार दूरसंचार कंपन्या आहेत. Jio, Airtel आणि VI या खाजगी दूरसंचार कंपन्या आहेत. या सर्वांनी अलीकडेच आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. मात्र, BSNL ने अजूनही आपल्या जुन्या किमती कायम ठेवल्या आहेत. दरम्यान, या कंपन्यांच्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घ्या, ज्यामध्ये युजर्सना दररोज 1.5 GB डेटा आणि 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
Jio चा 799 रुपयांचा प्लॅन Jio चा 799 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये यूजरला 84 दिवसांसाठी दररोज 1.5 GB डेटा मिळतो. म्हणजेच एकूण 126 GB डेटा मिळतो. याशिवाय यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 300 SMS देखील मिळतात. यासोबतच या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cloud आणि Jio Cinema चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते. पण, यात अनलिमिटेड 5G डेटा नाही.
Jio चा 889 रुपयांचा प्लॅन Jio चा आणखी एक प्लॅन 889 रुपयांचा आहे. यामध्ये देखील युजर्सला 84 दिवसांसाठी दररोज 1.5 GB डेटा मिळतो, म्हणजेच एकूण 126 GB डेटा मिळतो. याशिवाय यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 300 एसएमएस देखील मिळतात. या प्लॅनसोबत Jio Saavn Pro, Jio TV, Jio Cloud आणि Jio Cinema चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. मात्र, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा उपलब्ध नाही.
Airtel चा प्लॅन Airtel चा प्लॅन 859 रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी दररोज 1.5 GB डेटा मिळतो. याशिवाय, तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला Apollo 24/7 Circle, मोफत Hellotunes आणि मोफत Wynk Music सारख्या सेवा देखील मिळतात.
VI चा प्लॅन VI चा प्लॅन 859 रुपयांचा आहे. यामध्ये युजरला 84 दिवसांसाठी दररोज 1.5 GB डेटा मिळतो. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delight सारख्या सेवा देखील प्लॅनमध्ये मिळतात.
BSNL चा प्लॅन BSNL चा प्लॅन सर्वात स्वस्त आहे आणि तो 485 रुपयांमध्ये येतो, परंतु यामध्ये तुम्हाला 82 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. या प्लॅनमध्ये इतर कोणतेही बेनिफिट्स नाहीत.
कोणता प्लॅन स्वस्त? जर तुम्ही सर्व प्लॅन्सची तुलना केली तर सर्वात स्वस्त प्लॅन बीएसएनएलचा आहे. परंतु, यामध्ये दोन दिवसांची व्हॅलिडिटी कमी आहे आणि इतर कोणतेही फायदे नाहीत. जर तुम्हाला फक्त डेटा आणि कॉलिंगसाठी स्वस्त प्लॅन हवा असेल तर तुम्ही बीएसएनएल प्लॅन घेऊ शकता. तुम्हाला अधिक बेनिफिट्स हवे असतील तर तुम्ही इतर कंपन्यांच्या प्लॅन्सचा विचार करू शकता.