एका रिचार्जमध्ये चालणार 3 SIM; Jio-Airtel च्या या प्लॅनमध्ये जबरदस्त फायदा, 150GB पर्यंत डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 10:22 PM2022-04-13T22:22:31+5:302022-04-13T22:26:20+5:30

टेलिकॉम कंपन्यांनी किमतीत वाढ केल्यापासून, प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये फारसा फरक राहिलेला नाही.

टेलिकॉम कंपन्यांनी किमतीत वाढ केल्यापासून, प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये फारसा फरक राहिलेला नाही. काही पोस्टपेड प्लॅन्सची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला फॅमिली कनेक्शनची सुविधा देखील दिली जाते.

दूरसंचार कंपन्यांकडे असे अनेक पोस्टपेड प्लॅन्स आहेत, जे तुम्हाला चांगल्या किमतीत चांगले फायदे देतात. येथे आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलच्या (Airtel) परवडणाऱ्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत.

799 रुपयांच्या महिन्याच्या या Jio पोस्टपेड प्लॅनमध्ये एका प्रायमरी सिमसह कुटुंबातील सदस्यांसाठी दोन अतिरिक्त सिम कार्ड दिलं जातं. यामध्ये तुम्हाला एकूण 150 GB डेटा मिळेल.

यामध्ये तुम्ही 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर करू शकता. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसोची सुविधा देखील देण्यात येते.

पोस्टपेड प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ग्राहकांना अनेक OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन मिळतं. जिओच्या प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime), डिस्ने प्लस हॉटस्टारसह (Disney+ Hotstar) जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

Jio प्रमाणे, Airtel च्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये सुद्धा दोन फॅमिली सिम आणि एक रेग्युलर सिमची सुविधा मिळते. यामध्ये ग्राहकांना एकूण 100 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS चा लाभ मिळेल. यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार मेंबरशिप, एअरटेल एक्सट्रीम, अॅमेझॉन प्राईम आणि विंक म्युझिकचं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.