फायद्याची बातमी! Jio ने लॉन्च केला स्वस्त प्लॅन, मिळणार अनलिमिटेड कॉल्स, 42GB डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 02:20 PM2024-07-29T14:20:05+5:302024-07-29T15:09:01+5:30

Jio Recharge : Jio ने काही दिवसापूर्वीच आपल्या रिचार्जच्या दरात वाढ केली होती. आता पुन्हा एकदा नवीन प्लॅन लाँच केला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीपासून बीएसएनएल वगळता सर्व टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली. कंपन्यांनी टॅरिफमध्ये २५ टक्के वाढ केली आहे.

जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. जिओने नवीन रिर्चार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना फायदा होणार आहे.

रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर आहे. जिओने स्वतः स्वस्त प्लॅन आणून भारतात स्मार्टफोनमध्ये क्रांती केली आहे. कंपनीने गेल्या वर्षी फक्त ९९९ रुपयांमध्ये परवडणारा Jio Bharat V2 फोन लॉन्च केला होता.

त्याच वेळी, कंपनीने आता 4G फीचर फोनसाठी नवीन प्रीपेड पॅक सादर केला आहे. या प्लॅनमध्ये कंपनी स्वस्तात कॉलिंग, 5G डेटा, OTT सबस्क्रिप्शन आणि स्वस्त फोन देत आहे.

याची किंमत २९९ रुपये आहे. या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि भरपूर डेटा देखील मिळतो.

या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 42GB डेटा मिळतो. म्हणजेच दररोज 1.5GB डेटा मिळेल. याशिवाय तुम्ही दररोज 100 एसएमएस देखील पाठवू शकता.

याशिवाय तुम्हाला Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud मिळेल. डेटा संपल्यानंतर तुम्हाला 64kbps चा स्पीड मिळेल. या प्लॅनमध्ये Jio Cinema Premium उपलब्ध होणार नाही. यासाठी तुम्हाला जिओचे वेगळे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

रिलायन्स जिओ अमर्यादित 5G सह एक योजना देखील ऑफर करत आहे. त्याची किंमत ३४९ रुपये आहे. या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते.

टॅग्स :जिओJio