Jio ने वाढवलं BSNL चे टेन्शन! दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन्स लाँच, दररोज १० रुपयांपेक्षा कमी खर्चात मिळतील जास्त बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 11:38 AM2024-11-04T11:38:46+5:302024-11-04T13:02:03+5:30

Jio Best Prepaid Plan: बीएसएनएलची (BSNL) वाढती लोकप्रियता लक्षात घेता जिओने आपले दोन स्वस्त प्रीपेड प्लान सादर केले आहेत.

आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओने (Jio) नुकतीच दिवाळी ऑफर जाहीर केली होती. या प्लॅनमध्ये ग्राहकांना फ्री रिचार्ज आणि अतिरिक्त डेटा सारखे बेनिफिट्स मिळत आहेत. दरम्यान, बीएसएनएलची (BSNL) वाढती लोकप्रियता लक्षात घेता जिओने आपले दोन स्वस्त प्रीपेड प्लान सादर केले आहेत.

या प्लॅन्सची किंमत ८९९ रुपये आणि ९९९ रुपये आहे. या प्लॅन्समध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा सारखे फायदे दररोज १० रुपयांपेक्षा कमी खर्चात मिळतात. या प्लॅन्सची व्हॅलिडिटी ९० ते ९८ दिवसांची आहे. या दोन्ही खास रिचार्ज प्लॅन्सबद्दल सविस्तर जाणून घ्या...

जिओच्या या ८९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ९० दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. कॉलिंग कोणत्याही नेटवर्कवर फ्री आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. तसेच, २० जीबी अतिरिक्त डेटाही दिला जात आहे. यासोबतच युजर्सना दररोज १०० फ्री एसएमएसचाही लाभ मिळतो. जिओचा हा प्लॅन बजेट फ्रेंडली ऑप्शनमध्ये येतो.

जिओचा ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ९८ दिवसांची व्हॅलिडिटी आहे. यामध्ये ग्राहकांना रोजचा जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचे बेनिफिट्स मिळतात. यासोबतच ग्राहकांना दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये JioTV आणि JioCinema चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे.

दरम्यान, बीएसएनएलच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​किंमत ११९८ रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. या प्लॅनच्या बेनिफिट्सबद्दल सांगायचे झाले तर, ग्राहकांना देशभरातील कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी दर महिन्याला ३०० फ्री मिनिटे दिली जातात. याशिवाय या प्लॅनमध्ये लोकांना दर महिन्याला ३ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये ग्राहकांना दर महिन्याला ३० फ्री एसएमएसची सुविधाही मिळते.

बीएसएनएलने आपल्या ३६५ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची ​​किंमतही कमी केली आहे. कंपनीने या प्लॅनची किंमत १०० रुपयांनी कमी केली आहे. या प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये लोकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, यामध्ये ग्राहकांना कोणत्याही डेली लिमिटशिवाय एकूण ६०० जीबी डेटा मिळतो. याशिवाय प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज १०० मोफत एसएमएस देखील दिले जातात. या प्लानची किंमत आधी १९९९ रुपये होती, जी आता १८९९ रुपये झाली आहे. दरम्यान, हा प्लॅन अशा लोकांसाठी चांगला मानला जातो, जे बीएसएनएल सिम सक्रिय ठेवू इच्छितात आणि दुय्यम सिम म्हणून वापरू इच्छितात.