₹27 वरून थेट ₹400 वर पोहोचला हा शेअर, 3 वर्षांत दिला 1400% परतावा, गुंतवणूकदार मालामाल By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 05:53 PM 2023-08-30T17:53:53+5:30 2023-08-30T18:03:35+5:30
या कंपनीच्या शेअरने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1,400 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. स्टील पाईप्सच्या व्यवसायात गुंतलेल्या एका कंपनीने गेल्या 3 वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. या कंपनीचे नाव आहे जेटीएल इंडस्ट्रीज लिमिटेड. या कंपनीच्या शेअरने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1,400 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे.
या कंपनीच्या शेअर्सची किंमत 28 ऑगस्ट 2020 रोजी 26.9 रुपयांवर बंद झाली होती. 30 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीचा शेअर BSE वर जवळपास 2 टक्क्यांच्या तेजीसह 403.95 रुपयांवर ट्रेड करत आहे. यानुसार, कंपनीच्या शेअरने आतापर्यंत 1,400 टक्क्यांहूनही अधिक परतावा दिला आहे.
असा आहे कंपनीचा परफॉर्मन्स - कंपनीने जून, 2023 तिमाहीत 25.4 कोटी रुपयांचा नफा नोंदवला. तर गेल्या वर्षाच्या याच कालावधीत कंपनीला 11 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा रेव्हेन्यू वाढून 505.6 कोटी रुपये झाला. जो एक वर्षापूर्वी 259.24 कोटी रुपये होता. तसेच दुसऱ्या बाजूला कंपनीचा ऑपरेटिंग नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढून 35.5 कोटी रुपयांवर पोहोचला.
शेअरची स्थिती - जेटीएल इंडस्ट्रीजचा शेअर मंगळवारी बीएसईवर 398.85 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. कंपनीच्या एकूण 0.85 लाख शेअर्सनी मंगळवारी बीएसईवर 3.38 कोटी रुपयांचा व्यवहार केला.
कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 416.75 रुपये एवढा आहे. तर निचांक 185.70 रुपये एवढा आहे. तसेच कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3436.98 कोटी रुपये आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)