Multibagger Share Investment : ३६ पैशांचा शेअर गेला १३० रुपयांच्या पार; गुंतवणूकदार मालामाल, १ लाखाचे झाले ३.५ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 05:44 PM2022-04-29T17:44:06+5:302022-04-29T17:50:36+5:30

Multibagger Share Investment : कंपनीच्या शेअरनं एका वर्षामध्ये ३६१६३ टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.

एका कमी किंमतीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना जबरदस्त मालामाल केलं आहे. कंपनीच्या या शेअरची किंमत ३६ पैशांवरून वाढून १३० रुपयांच्या वर गेली आहे. कैसर कॉर्पोरेशन असं या कंपनीचं नाव आहे.

कंपनीच्या या शेअरनं एका वर्षात गुंतवणूकदारांना ३६ हजार टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत. दरम्यान, यामध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअरनं ५२ आठवड्याची निचांकी पातळी गाठली आहे.

कैसर कॉर्पोरेशनचे शेअर ५ मे २०२१ रोजी बीएसईवर ३६ पैशांच्या स्तरावर होते. कंपनीचे शेअर २९ एप्रिल २०२२ रोजी बीएसईवर १३०.५५ रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअरनं एका वर्षापेक्षाही कमी कालावधीत ३६,१६३ टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.

जर एखाद्या व्यक्तीनं कंपनीच्या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि आजही ती गुंतवणूक कायम ठेवली असेल तर ती व्यक्ती मालामाल झाली असती. त्या १ लाख रूपयांचं मूल्य आज ३.६ कोटी रुपयांच्या जवळ असतं.

कंपनीच्या शेअरनं यावर्षी आतापर्यंत ४ हजार टक्क्यांपेक्षा अधिकचे रिटर्न्स दिले आहेत. ३ जानेवारी २०२२ रोजी कंपनीचे शेअर बीएसईवर २.९२ रुपयांच्या स्तरावर होते. ते २९ एप्रिल २०२२ रोजी १३०.५५ रुपयांच्या स्तरावर पोहोचले.

जर एखाद्या व्यक्तीनं वर्षाच्या सुरूवातीला कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचं मूल्य आज ४४.७० लाख रुपये असतं. कंपनीच्या शेअर्सनं गेल्या वर्षभराच्या कालावधीत १७५ टक्क्यांचे रिटर्न्स दिले आहेत.