Jio चा स्वस्तात मस्त प्लान! कमी किमतीत ८४ दिवसांची वैधता अन् मोठे फायदे; Airtel-Vi चितपट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 04:00 PM2022-02-15T16:00:40+5:302022-02-15T16:06:12+5:30

तुम्ही ८४ दिवसांच्या वैधतेचे प्लान शोधत असाल तर जिओ, एअरटेल आणि वीआयकडे चांगले प्लान्स उपलब्ध आहेत.

आताच्या घडीला टेलिकॉम क्षेत्रात ग्राहक टिकवण्यासाठी मोठी चढाओढ असल्याचे पाहायला मिळत आहे. एकापेक्षा एक आकर्षक प्लान सादर करून युजर्सना जास्त बेनिफिट देण्याचा प्रयत्न जवळपास प्रत्येक टेलिकॉम कंपनीकडून केल्याचे पाहायला मिळत आहे.

Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea कडे ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारे शानदार प्लान्स उपलब्ध आहे. कमी किंमतीत येणाऱ्या या प्लान्समध्ये जबरदस्त बेनिफिट्स मिळतात. मात्र, या सर्व प्लानमध्ये जिओ बाजी मारत असल्याचे सांगितले जात आहे.

खासगी टेलिकॉम कंपन्या Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea कडे अगदी १४ दिवसांपासून ते ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे अनेक शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये यूजर्सला डेटा, कॉलिंग, एसएमएससह अनेक अतिरिक्त बेनिफिट्स मिळत आहे.

या अनेकविध प्लानपैकी प्रामुख्याने ८४ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लान्सला यूजर्सची पसंती मिळताना दिसत आहे. तुम्ही देखील ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स शोधत असाल तर जिओ, एअरटेल आणि वीआयकडे असेच काही चांगले प्लान्स उपलब्ध आहेत.

Vi कडे ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारा ७१९ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये यूजर्सला दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळतात.

याशिवाय Vi कडे ८३९ रुपयांचा एक प्लान आहे. या प्लानमध्ये ८४ दिवसांच्या वैधतेसह दररोज २ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉल आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओव्हर, वीआय मूव्हीज अँड टीव्हीचा अ‍ॅक्सेस आणि दर महिन्याला मोफत २ जीबी डेटा बॅकअप मिळतो.

Airtel कंपनीचा ७१९ रुपयांच्या प्रीपेड प्लान्समध्ये यूजर्सला ८४ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे मोफत ट्रायल आणि Wynk म्यूझिकचा अ‍ॅक्सेस मिळेल.

याशिवाय Vi प्रमाणे Airtel कडे ८३९ रुपयांचा देखील शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये ८४ दिवसांच्या वैधतेसह दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे मोफत ट्रायलचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल.

या सर्वांपेक्षा स्वस्त प्लान Jio कडे आहे. जिओच्या ६६६ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता दिली असून, यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा दिली जात आहे. याशिवाय, Jio Cinema, Jio TV सारख्या अ‍ॅप्सचे देखील सबस्क्रिप्शन मिळेल.

Jio कडे ७१९ रुपयांच्या वैधतेसह येणारा आणखी एक शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉइस कॉलिंगसह दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.

प्लानची वैधता ८४ दिवस आहे. याशिवाय, १,०६६ रुपयांचा प्लान देखील कंपनीकडे असून, यात देखील समान बेनिफिट्स मिळतात. मात्र, डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन आणि अतिरिक्त ५ जीबी डेटा मिळेल.

तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे जिओ, एअरटेल किंवा व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक असाल, तर प्लान निवडू शकता, असे सांगितले जात आहे.