सोन्याच्या दागिन्यांबाबत काय आहेत इन्कम टॅक्सचे नियम; घरात किती सोनं ठेवू शकता? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 05:56 PM2022-08-21T17:56:57+5:302022-08-21T18:04:26+5:30

तुम्हाला सोनं खरेदी केल्याची पावतीही सोबत ठेवावी लागते. पाहा काय म्हणतो हा नियम.

सोनं ही अशी वस्तू आहे जी प्रत्येकाला ते हवीहवीशी वाटते. दागिन्यांच्या स्वरूपात, नाणी किंवा बिस्किटांच्या स्वरूपात काही जण सोनं आपल्याकडे ठेवत असतात. आता डिजिटल गोल्ड आणि गोल्ड बाँड्सचा ट्रेंडही तेजीत आहे. सोन्यामधील गुंतवणूक ही फायद्याचीच ठरत असते. त्यामुळे अनेकांचा कल कायमच सोने खरेदीकडे असतो.

तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर सोन्याचे दागिने हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण आयकर विभागाची नजर तुमच्यावर पडू नये म्हणून दागिने किती ठेवावेत हे माहितीये? कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांच्या बाबतीत आयकराचे नियम माहित असणे आवश्यक आहे.

पहिला प्रश्न आता तुमच्या मनात आला असेल तो म्हणजे सोन्याचे किती दागिने ठेवले म्हणजे आपल्याला कोणती समस्या निर्माण होणार नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की त्याची पावती घ्यावी लागेल. ती पावती तुमच्याकडे ठेवा. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या परिपत्रकात असे म्हटले आहे की सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, परंतु तुम्हाला त्याचा स्रोत देखील सांगावा लागेल.

इन्कम टॅक्स विभागाची कारवाई होऊ नये यासाठी घरात किती सोन्याचे दागिने ठेवायचे हा पहिला प्रश्न पडतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोने किंवा त्याचे दागिने खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की त्याची स्लिप घ्यावी लागेल. ती स्लिप तुमच्याकडे ठेवा. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या परिपत्रकात असे म्हटले आहे की सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, परंतु तुम्हाला त्याचा स्रोत देखील सांगावा लागेल. तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांचा स्रोत विचारला गेल्यास, तुम्हाला खरेदीदरम्यान घेतलेली तीच स्पावती दाखवावी लागेल. अशा स्थितीत तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

जर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची कारवाई टाळायची असेल तर तुमची जितकी कमाई तितक्याच प्रमाणात सोनं असणं आवश्यक आहे. १० हजारांची कमाई आणि ५० लाखांचे सोने घरात सापडले तर तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. जर स्त्रोताची माहिती दिली नाही तर विभाग किंवा CBDT तुमचे सोने जप्त करू शकतात.

सीबीडीटीने हेही सांगितले आहे की घरात किती सोने ठेवण्याची परवानगी आहे आणि अशा परिस्थितीत कोणतीही कारवाई केली जाणार नाही. विवाहित महिला ५०० ग्रॅम सोने ठेवू शकते. अविवाहित महिलेला २५० ग्रॅम सोने ठेवण्याची परवानगी आहे. एक माणूस १०० ग्रॅम सोने ठेवू शकतो. घरात पकडलेले सोने जप्त करायचे की नाही, हे मूल्यांकन अधिकाऱ्यावर अवलंबून आहे. काही कुटुंबांमध्ये त्यांच्या चालिरीती आणि परंपरा यांच्या आधारावर सोन्याची मर्यादा निश्चित केली जाते. येथे आपण सोन्याच्या दागिन्यांबद्दल बोलत आहोत. हे सोने त्याच्या कुटुंबातील सदस्याचेच असावे. दुसऱ्याचे सोने तुमच्या घरी ठेवल्यास ते जप्त केले जाऊ शकते.

सोने तुमचेच आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावे लागतील. हा गुंतवणुकीचा पुरावा आहे जो आयकर रिटर्नमध्ये दाखवावा लागतो. यासाठी तुम्ही टॅक्स इनव्हॉइस दाखवू शकता. जर सोने भेटवस्तू किंवा वारशाने मिळाले असेल, तर तुम्ही प्रथम त्याची मालकाची पावती दाखवू शकता. जर सोने वारशाने मिळाले असेल तर तुम्ही पुरावा म्हणून फॅमिली सेटलमेंट डीड दाखवू शकता.