Jan Dhan Yojana: बचत खाते जनधन खात्यात रुपांतरीत करायचेय? ‘ही’ आहे सोपी प्रक्रिया By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 02:59 PM 2021-05-11T14:59:42+5:30 2021-05-11T15:04:45+5:30
Jan Dhan Yojana: अनेकविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचे बचत खाते जन धनमध्ये रुपांतरित करू शकता. (Convert Savings Account Into Jan dhan) नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खात्यांचा शुभारंभ करण्यात आला होता. या जनधन खात्यांचे अनेक लाभ मिळवता येतात. तसेच याचा अनेक गोष्टींसाठी उपयोग होतो, असे सांगितले जाते.
जन धन खात्यात उपलब्ध असलेले सर्वोत्तम फायदे सर्वश्रुत आहेत. जन धन खात्यात किमान रक्कम ठेवण्याची कोणतीही अट नाही. ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे. नि: शुल्क जीवन विमा यांसारख्या अनेकविध सुविधा उपलब्ध आहेत.
मात्र, बँकेत सामान्य बचत खात्यांमध्ये अशा प्रकारच्या सुविधांचा लाभ घेता येत नाही. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचे बचत खाते जन धनमध्ये रुपांतरित करू शकता. (Convert Savings Account Into Jan dhan)
एक सोपी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सामान्य बचत खात्याचे जनधन खात्यात रुपांतर करणे शक्य होते. PMJDY साठी अर्ज करण्यासाठी आपल्याला फक्त एक फॉर्म भरणे आवश्यक आहे.
जनधन योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी आपण भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे. तसेच १० वर्षांपेक्षा जास्त वयाचे पण अल्पवयीन मुलेही जनधन खाते उघडण्यास पात्र आहेत.
संबंधित बँकेत जाऊन केव्हायसी कागदपत्रांसह लेखी अर्ज बँकेला द्यावा लागेल. तसेच रुपे कार्ड मिळवण्यासाठी अर्ज सादर करावा लागेल. याशिवाय बचत बँक खात्याचे जनधन खात्यात हस्तांतरण करण्यासंदर्भातील माहिती द्यावी लागेल.
रुपे डेबिट कार्ड मिळाल्यानंतर तीन ते चार दिवसांत बचत खाते जनधन खात्यात रूपांतरित होऊ शकेल. मात्र, यासाठी काही महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रे बँकेला सादर करावी लागतात.
खातेदाराचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव, व्यवसाय/रोजगार, अवलंबितांची संख्या, वार्षिक उत्पन्न, नामनिर्देशित, गाव कोड किंवा शहर कोड अशी काही माहिती विहित नमुन्यात भरणे आवश्यक आहे.
याशिवाय, आधार कार्ड व्यतिरिक्त पॅनकार्ड, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यांसारखे कोणतेही कागदपत्र सादर करावी लागतात.