Know about Interesting facts about bill gates lifestyle
800 कोटींच्या घरात राहतात बिल गेट्स; तुम्हाला क्वचितच माहीत असतील त्यांच्या बद्दलच्या 'या' खास गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 06:14 PM2021-02-08T18:14:49+5:302021-02-08T18:19:39+5:30Join usJoin usNext बिल गेट्स यांना कोण ओळखत नाही. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, ते सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र, एक काळ होता, तेव्हा ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. बिल गेट्स केवळ 32 वर्षांचे असतानाच त्यांचे नाव अब्जाधिशांच्या फोर्ब्स लिस्टमध्ये आले होते. ते 'दानवीर' म्हणूनही ओळखले जातात. गेट्स यांनी 2007 मध्ये जगभरातील गरजू लोकांच्या मदतीसाठी जवळपसा 1760 अब्ज रुपये दान केले होते. जाणून घेऊयात गेट्स यांच्या संदर्भातील काही खास गोष्टी, ज्या तुम्हालाही क्वचितच माहीत असतील. बिल गेट्स हे एक कॉलेज ड्रॉपआउट होते. जगभरातील काही यशस्वी उद्योजकांप्रमाणेच त्यांनाही आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले नाही. गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टसोबतचे आपले स्वप्त पूर्ण करण्यासाठी जगातील प्रसिद्ध हार्वर्ड यूनिव्हर्सिटी सोडली होती. खरे तर जगभरातील विद्यार्थी या विद्यापीठातून शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असतात. बिल गेट्स यांना पुस्तके वाचण्याचा नाद आहे. एका वृत्तानुसार, गेट्स यांनी दावा केला होता, की ते दरवर्षी जवळपास 50 पुस्तके वाचतात. बिल गेट्स केवळ 22 वर्षांचे असताना 1977मध्ये न्यू मॅक्सिकोत वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. ते आपली कार फार वेगात चालवत होते आणि त्यांच्याकडे लायसन्सदेखील नव्हते. बिल गेट्स ज्या घरात राहतात, त्या घराची किंमत जवळपास 800 कोटी रुपये एवढी आहे. स्विमिंग पूलसह सर्व सुख-सुविधा असलेल्या या घरात एक मोठी लायब्ररीदेखील आहे. यात लिओनार्डो द विंचीचे एक हस्तलिखीतही आहे. गेट्स यांनी ते 1994 मध्ये एका लिलावात विकत घेतले होते.टॅग्स :बिल गेटसघरअमेरिकाBill GatesHomeAmerica