तुमच्याकडेही LIC पॉलिसी आहे? लवकरच करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठे नुकसान By देवेश फडके | Published: March 4, 2021 07:23 PM 2021-03-04T19:23:19+5:30 2021-03-04T19:29:27+5:30
LIC कडून लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी ग्राहकांना देण्यात आली आहे. Special Revival Campaign ही विशेष पॉलिसी पुनरुज्जीवन मोहीम ७ जानेवारीपासून LIC कडून सुरू करण्यात आली होती. जाणून घ्या सर्व डिटेल्स... (know about LIC policy Special Revival Campaign and revive your lapsed policies till 6 march 2021) देशातील कोट्यवधी लोकांकडे LIC पॉलिसी आहे. देशातील सर्वांत मोठी, विश्वासार्ह आणि लोकप्रिय विमा कंपनी म्हणून LIC कडे पाहिली जाते. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (Life Insurance Coporation of India) ग्राहकांसाठी महत्त्वाची तसेच उपयोगाची योजना आणली आहे.
LIC कडून लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी ग्राहकांना देण्यात आली आहे. अनेकविध कारणांमुळे इच्छा असूनही LIC ची पॉलिसी सुरू ठेवता येत नाही. आर्थिक चंचण निर्माण झाल्यामुळे पॉलिसीचे हफ्ते वेळेत भरता न आल्यामुळे पॉलिसी लॅप्स होते. (Special Revival Campaign)
LIC ची चांगली पॉलिसी लॅप्स झाली, तर वाईट वाटते. आपली लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची शेवटची संधी LIC कडून दिली जात आहे. पॉलिसीधारक ६ मार्चपर्यंत बंद केलेली किंवा झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करू शकतो. ही विशेष पुनरुज्जीवन मोहीम ७ जानेवारीपासून LIC कडून सुरू झाली असून, तिची मुदत ६ मार्चपर्यंत आहे.
LIC च्या या विशेष पुनरुज्जीवन शिबिराच्या अंतर्गत काही विशेष योजनांच्या पॉलिसी पुन्हा नव्याने तयार केल्या जाऊ शकतात. आपली बंद झालेली पॉलिसी चालू न झाल्यास आपले मोठे नुकसान होऊ शकते. तसेच आपण जीवन विम्याचा लाभ घेऊ शकणार नाही.
LIC च्या विशेष पुनरुज्जीवन मोहिमेंतर्गत ज्या पॉलिसीधारकाने हप्ता जमा करण्याच्या पहिल्या कालावधीनंतर पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला नाही, त्याच पॉलिसीचे पुनरुज्जीवन केले जाईल, असे सांगितले जात आहे.
LIC च्या विशेष मोहिमेअंतर्गत पुनरुज्जीवनासाठी पॉलिसीधारकांना उशिरा शुल्क आणि आरोग्याच्या आवश्यकतांवर सूट मिळू शकेल. यासाठी अनेक प्रकारच्या अटी आणि शर्थी लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.
आरोग्य विमा, मुदत विमा आणि एकाधिक जोखीम पॉलिसीसारख्या उच्च जोखीम योजनांच्या बाबतीत, उशिरा शुल्कात सूट मिळणार नाही. ज्या LIC पॉलिसीची प्रीमियम पेमेंट टर्म संपली आहे आणि ज्या पॉलिसींची मुदत पुनरुज्जीवन मुदतीपर्यंत पूर्ण झालेली नाही, अशा पॉलिसींचे पुनरुज्जीवित केले जाऊ शकते.
LIC ची लॅप्स पॉलिसी पुनरुज्जीवित झाल्यास पॉलिसीधारकांना वार्षिक प्रीमियमवर एक लाख रुपयांपर्यंत २० टक्के किंवा कमाल दोन हजार रुपये उशिरा फी भरावी लागेल. पॉलिसीधारकाचे वार्षिक प्रीमियम एक लाख ते तीन लाख रुपयांदरम्यान असेल, तर त्याला २५ टक्के किंवा त्याहून अधिक २५०० रुपयांची सूट मिळू शकते.
एवढेच नाही तर, ज्या LIC पॉलिसीधारकांचा प्रीमियम तीन लाख आणि त्यापेक्षा अधिक असेल, तर अशा पॉलिसीधारकांना २० टक्के किंवा कमाल ३ हजारांची सूट मिळू शकते, असे सांगितले जात आहे.
एलआयसीची पॉलिसीचे पुनरुज्जीवन करण्याची ग्राहकांना सुवर्ण संधी असून, या विशेष योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले जात आहे. या विशेष योजनेचा लाभ घेण्यासाठी LIC ग्राहक वा पॉलिसीधारकांकडे ६ मार्चपर्यंतचीच मुदत आहे, ही बाब ध्यानात ठेवावी, असे सांगितले जात आहे.