'हे' काम न केल्यास ३१ मार्चनंतर Deactivate होईल पॅनकार्ड; जाणून घ्या महत्त्वाचे डिटेल्स By देवेश फडके | Published: February 14, 2021 04:59 PM 2021-02-14T16:59:44+5:30 2021-02-14T17:04:51+5:30
आताच्या घडीला पॅनकार्ड अतिशय महत्त्वाचे झाले आहे. बँकिंग व्यवहार असो मग किंवा एखाद्या मोठ्या रकमेचे बिल भरणे असो, पॅनकार्ड आवश्यक कागदपत्रांपैकी एक झाले आहे. मात्र, पॅनकार्ड Activate ठेवायचे असल्यास एक महत्त्वाची गोष्ट करावी लागणार आहे. प्राप्तिकर विभागाने यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. आताच्या घडीला पॅनकार्ड अतिशय महत्त्वाचे झाले आहे. बँकिंग व्यवहार असो मग किंवा एखाद्या मोठ्या रकमेचे बिल भरणे असो, पॅनकार्ड आवश्यक कागदपत्रांपैकी एक झाले आहे. मात्र, पॅनकार्ड Activate ठेवायचे असल्यास एक महत्त्वाची गोष्ट करावी लागणार आहे.
प्राप्तिकर विभागाने यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. पॅनकार्डला आधार क्रमांक जोडण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२१ आहे. अन्यथा ३१ मार्चनंतर पॅन-आधार जोडले गेले नसेल, तर ०१ एप्रिल २०२१ पासून पॅनकार्ड डिअॅक्टिव्हेट केले जाईल, असे आयकर विभागाने म्हटले आहे.
पॅनकार्ड बंद झालं तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. आता आयकर परतावा (आयटीआर) दाखल करण्यासाठी पॅन कार्डासह आधार क्रमांक देणे बंधनकारक असणार आहे.
पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० होती. मात्र, ती वाढवून आता ३१ मार्च २०२१ करण्यात आली आहे. पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते यापुढे बाद ठरणार आहे.
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२१ नंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड वापरल्यास आयकर कलम 272 (B) अंतर्गत दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे करदात्यांनी ३१ मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नाही, तर पॅनकार्ड बाद होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल. त्यामुळे अवैध ठरलेल्या पॅनकार्डचा काही उपयोग करता येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय आयकर परतावा भरणे शक्य होणार नाही.
गतवर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. त्यामुळे आता आधार कार्ड हेही महत्त्वाचे कागदपत्र झाले असून, जवळपास प्रत्येक ठिकाणी आधारकार्डची आवश्यकता भासत असते.
पॅन आणि आधार कार्ड जोडणी करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.
या संकेतस्थळावर गेलात की, तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. यानंतर नंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.
सदर माहिती भरल्यानंतर येणारा कॅप्चा कोड काळजीपूर्वक दिलेल्या बॉक्समध्ये भरा. सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.