कंपनीतील अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त आहे मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरची कमाई! माहीत आहे किती? जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 05:39 PM2024-07-21T17:39:34+5:302024-07-21T17:45:34+5:30

मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरला किती सॅलरी आहे? तो वर्षाला किती कमावतो? हे तुम्हाला माहीत आहेका? तर जाणून घेऊयात...

मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते देशातील सर्वात आलिशान घरात राहतात. कमाईच्या बाबतीत त्यांना तोड नाही. पण, त्यांच्या ड्रायव्हरला किती सॅलरी आहे? तो वर्षाला किती कमावतो? हे तुम्हाला माहीत आहेका? तर जाणून घेऊयात.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा टेक्सटाइल, रीटेल आणि टेलीकम्यूनिकेशनसह अेक क्षेत्रात विस्तार झाला आहे.

एकूण संपत्ती किती? - 17 जुलै 2024 पर्यंत फोर्ब्सने आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांना पहिल्या क्रमांकावर, तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11 व्या स्थानावर ठेवले होते. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे १२२ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.

रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना मुकेश अंबानी यांचे दिवंगत पिता धीरूभाई अंबानी यांनी 1966 मध्ये केली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजचा विस्तार टेक्सटाइलपासून पेट्रोकेमिकल्स, रिटेल आणि टेलिकम्युनिकेशन्सपर्यंत झाला आहे. वडिलांच्या पश्चात मुकेश अंबानी आणि त्यांचे भाऊ अनिल अंबानी यांनी हा व्यवसाय पुढे नेला.

मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते देशातील सर्वात महागड्या घरात राहत्यात. त्याचे हे घर मुंबईत असून अँटिलिया असे त्याचे नाव आहे. त्यांचे घर 4 लाख स्क्वेअर फूट पेक्षाही अधिक क्षेत्रात पसरलेले आहे. या घराची अंदाजे किंमत 16,000 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.

मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरची सॅलरी - माध्यमांतील वृत्तांनुसार, मुकेश अंबानीचा ड्रायव्हर दर महिन्याला 2 लाख रुपये कमावतो. अशा प्रकारे त्याचे वार्षिक उत्पन्न 24 लाख रुपये एवढे होते. अंबानी यांच्या ड्रायव्हरला अवघड ट्रेनिंग दिली जाते आणि तो कॉमर्शियल आणि लक्झरी असे कोणत्याही प्रकारचे वाहन चालवू शकतो.