शिक्क्यांवर असलेल्या अंगठ्याचा अर्थ तुम्हाला माहितीये?, जाणून घ्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 08:48 PM2022-04-21T20:48:12+5:302022-04-21T21:02:34+5:30

सध्या आपल्याकडे अनेक शिक्के चलनात आहेत. तर आपण वापरत असलेल्या अनेक शिक्क्यांवर काही विशेष चित्रही आपल्याला दिसतं.

सध्या आपल्याकडे अनेक शिक्के चलनात आहेत. तर आपण वापरत असलेल्या अनेक शिक्क्यांवर काही विशेष चित्रही आपल्याला दिसतं. परंतु एक रुपयाच्या शिक्क्यावर असलेल्या अंगठ्याच्या चित्राचा अर्थ काय हे अनेकांना कदाचित माहित नसेल.

या चित्राच्या मागे एक गोष्ट दडलेली आहे. आपल्याकडे असलेल्या अनेक शिक्क्यांवर काही ना काही खास चित्र असल्याचं आपण पाहतो. याचा अर्थ ऐतिहासिक बाबींशीदेखल असतो. परंतु याबाबत अनेकांना कल्पनाही नाही.

तुम्ही एक आणि दोन रुपयांच्या शिक्क्यांवर असलेलं चित्र पाहिलं आहे. परंतु हे केवळ एक डिझाइन म्हणून नाही. यामध्ये दिसत असलेल्या हातांच्या मागे एक गोष्ट आहे. पाहूया ती नक्की आहे तरी काय.

रिपोर्टनुसार या शिक्क्यांवरील डिझाइनचं काम नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ डिझाइनचे प्राध्यापक अनिल सिन्हा यांनी केलं होतं. यात असलेल्या अंगठ्याचा संबंध भरतनाट्यमशी आहे. जे तुम्ही शिक्के पाहता ते भरतनाट्यमशी संबंधित शिक्के आहे. हे चित्र तुम्हाला एक आणि दोन रुपयांच्या शिक्क्यांवर दिसून येतं.

या शिक्क्यांमध्ये ८३ टक्के लोह असतं. आज आपल्याकडे चलनात असलेल्या १ आणि २ रुपयांच्या शिक्क्यावर आपल्याला हे चित्र दिसून येतं.