Know your PF balance in minutes without going to EPFO s website umang app See step by step procedure
EPFO च्या वेबसाईटवर न जाता, मिनिटांत असा जाणून घ्या तुमचा PF बॅलन्स; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 08:58 AM2024-01-24T08:58:03+5:302024-01-24T09:14:07+5:30Join usJoin usNext पाहा कसा जाणून घेऊ शकता तुमचा बॅलन्स... संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये पीएफ खातं उघडणं आवश्यक आहे. या पीएफ खात्यात, कर्मचार्यांच्या निवृत्तीसाठी पैसे जमा केले जातात, ज्याचा एक भाग कर्मचारी आणि दुसरा भाग कंपनी दरमहा जमा करतात. सरकार यावर दरवर्षी व्याजही देत असतं. पीएफ खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या वेबसाइटवर जावं लागेल. येथे तुम्ही काही स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमची पीएफ शिल्लक जाणून घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला पीएफ शिल्लक जाणून घेण्याचा एक मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अवघ्या काही मिनिटांत पीएफची शिल्लक जाणून घेऊ शकता. ईपीएफओच्या वेबसाइटवर न जाता पीएफ शिल्लक जाणून घेण्यासाठी तुम्हाला उमंग अॅप डाउनलोड करावं लागेल. हे एक सरकारी अॅप आहे ज्यावर अनेक सरकारी सेवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. हे अॅप अँड्रॉइड आणि अॅपल प्ले स्टोअर या दोन्हींवर उपलब्ध आहे. सर्वप्रथम उमंग अॅप डाऊन केल्यानंतर ते ओपन करा. त्याठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर एन्टर करावा लागेल. त्यानंतर सर्च बारमध्ये जाऊन ईपीएफओ टाईप करा. त्यानंतर ईपीएफओचं पेज ओपन होईल. त्या ठिकाणी स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला Employee Centric Services असं सेक्शन दिसेल. या ठिकाणी पहिल्या नंबरवर असलेल्या View Passbook या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर नवं पेज ओपन होईल. तिथे Visit Service वर क्लिक करा. तुम्हाला तुमचा युएएन एन्टर करावा लागेल आणि त्यानंतर GET OTP वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. त्यानंतर तुमच्यासमोर पासबुक ओपन होईल. यामध्ये तुमच्या बॅलन्सची सर्व माहिती असेल.टॅग्स :भविष्य निर्वाह निधीसरकारProvident FundGovernment