जाणून घ्या, बदललेल्या नियमांमुळे चालू खात्यातून किती पीएफ काढता येतो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 11:17 PM2019-08-12T23:17:36+5:302019-08-12T23:21:28+5:30

प्रॉव्हिडंट फंड(PF)संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वीच सरकारनं काही बदल केले आहेत. आता कोणालाही पीएफ काढायचा असल्यात त्याला ऑनलाइन दावा करावा लागणार आहे.

आपण खात्यातून किती पीएफची रक्कम काढू शकता हे आपल्या स्थितीवर निर्भर आहे. जर मूल, भाऊ/बहिणीच्या लग्नासाठी पीएफ काढायचा असल्यास आपल्याला 50 टक्के पीएफ काढता येणार आहे.

पत्नी किंवा मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पीएफ खात्यातील 50 टक्के रक्कम व्याजासकट काढू शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला नोकरी करून सात वर्षं पूर्ण झालेली असली पाहिजेत.

जर आपल्याला घर किंवा जमीन खरेदी करायची आहे आणि आपल्या नोकरीला पाच वर्षं पूर्ण झालेली आहेत. तर काही अटी-शर्थींच्या माध्यमातून पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी अर्ज करता येतो.

प्लॉट खरेदीसाठी आपण मासिक वेतनातून 24 टक्के आणि घर खरेदीसाठी मासिक वेतनातून 36 टक्के पीएफ काढता येतो. अशा प्रकारात आप व्याजाच्या रकमेसाठीही क्लेम करू शकता.

जर स्वतःचा, पत्नी, मुलं किंवा आई-वडिलांच्या उपचारासाठी पैसे काढायचे असल्यास आपल्याला वेतनाच्या 6 टक्के रक्कम काढता येते. एखाद्या गंभीर आजारावरच्या उपचारासाठीही आपण खात्यातून पैसे काढू शकता. त्यासाठी रुग्णालयातील बिल, मेडिकल सर्टिफिकेट द्यावे लागते.