LIC: 8 हजारांच्या गुंतवणुकीवर 50 लाखांचा फायदा, असा आहे LIC चा 'हा' प्लॅन...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 05:18 PM2022-06-22T17:18:41+5:302022-06-22T17:22:01+5:30

LIC जीवन लाभ योजनेद्वारे तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. जाणून घ्या डिटेल्स...

LIC Plan: भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (LIC) लोकांना अनेक योजना पुरविल्या जातात. या योजनांचा लोकांना खूप फायदाही होतो. एलआयसीच्या अशा काही योजना आहेत, ज्यातून तुम्हाला आयुष्यभरही परतावा मिळू शकतो. यापैकी एक 'जीवन लाभ योजना' आहे.

जीवन लाभ एलआयसी योजना- LIC च्या जीवन लाभ योजना क्रमांक 936 द्वारे जीवन विम्यासह बरेच फायदे मिळू शकतात. या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे यामध्ये तीन वेगवेगळ्या टर्म्स निवडल्या जाऊ शकतात आणि त्यानुसार प्रीमियम जमा करावा लागतो.

LIC च्या जीवन लाभची ठळक वैशिष्ट्ये- या योजनेसाठी किमान वय 8 वर्षे आणि कमाल वय 59 वर्षे असावे. या योजनेत किमान विमा रक्कम (सम अॅश्युअर्ड) रुपये 2 लाख आहे. कमाल रकमेला मर्यादा नाही. यामध्ये 16 वर्षे, 21 वर्षे किंवा 25 वर्षे यानुसार कालावधी निवडता येतो.

16 वर्षांची मुदत निवडल्यास 10 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. 21 वर्षांची मुदत निवडल्यास 15 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. 25 वर्षांची मुदत निवडल्यास, 16 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. यात 8 हजारांपेक्षा कमी गुंतवणुकीवर 50 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळतो.

मोठा परतावा मिळवण्यासाठी ही पॉलिसी वयाच्या 25 व्या वर्षी सुरू करावी लागेल. तसेच, सम अॅश्युअर्ड 20 लाख रुपये निवडणे आवश्यक आहे. तसेच, मुदत 25 वर्षे घ्यावी लागेल. या अंतर्गत, पहिल्या वर्षी 93584 रुपये (रु.7960 प्रति महिना) प्रीमियम म्हणून भरावे लागतील. तर, पुढील वर्षापासून, 91569 रुपये(प्रति महिना 7788 रुपये) प्रीमियम म्हणून भरावे लागतील.

मुदत 25 वर्षांसाठी घेतली, तर प्रीमियम फक्त 16 वर्षांसाठी भरावा लागेल. 16 वर्षांनंतर पुढील वर्षांत कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही. यानंतर, विमाधारकाची वयाच्या 50 व्या वर्षी मॅच्युरिटी होईल, तेव्हा त्याला सुमारे 52,50,000 ची मॅच्युरिटी रक्कम मिळेल.