LIC IPO ला तुफान प्रतिसाद! ५,६२० कोटींची सदस्यता; १० कोटी लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 07:54 AM 2022-05-03T07:54:50+5:30 2022-05-03T07:59:24+5:30
दोन दशकांतील ‘सर्वोत्तम आयपीओ वर्ष’ ठरले असल्याची नोंद भारताच्या आर्थिक इतिहासात झाली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या IPO ला पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. २ मे रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी एलआयसीचा आयपीओ खुला झाला होता.
LIC IPO ला पहिल्याच फटक्यात मोठे यश मिळाल्याचे म्हटले जात आहे. याबाबत माहिती देताना अधिकारी म्हणाले की, अँकर गुंतवणूकदारांकडून ५,६२० कोटी रुपयांची पूर्ण सदस्यता प्राप्त झाली आहे.
अँकर गुंतवणूकदारांसाठी जास्तीत जास्त शेअर राखीव रुपये ५,६२० कोटी होते. LIC IPO ला या सेगमेंटमध्ये पूर्ण सबस्क्रिप्शन मिळाले. ४ मेपासून एलआयसीचा आयपीओ अन्य गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे.
केंद्र सरकारला LIC च्या IPO मधून २१ हजार कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. IPO अंतर्गत, सरकार कंपनीतील आपले २२,१३,७४,९२० शेअर्स विकत आहे आणि किंमत श्रेणी ९०२ ते ९४९ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना LIC IPO साठी अर्ज करण्याची सुविधा प्राप्त व्हावी, याकरीता ‘स्पाइस मनी’ या फिनटेक कंपनीने रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडशी (आयबीएल) भागीदारी केली आहे.
‘रेलिगेअर ब्रोकिंग’ ही कंपनी सध्या देशातील ४०० हून अधिक शहरांमध्ये अकराशेहून अधिक शाखा आणि व्यावसायिक भागीदारांच्या देशव्यापी नेटवर्कद्वारे १० लाखांहून अधिक ग्राहकांना डीमॅट सेवा देत आहे. ‘स्पाइस मनी’ ही १० लाखांहून अधिक व्यापाऱ्यांचे विस्तृत नेटवर्क असणारी अग्रगण्य ग्रामीण फिनटेक कंपनी, भारतातील ७००हून अधिक जिल्ह्यांमधील व दुर्गम भागातील १० कोटी कुटुंबांना सेवा देत आहे.
ग्रामीण पिन कोड क्षेत्रांतील ९५ टक्के भागांमधील नागरिकांना भविष्यकाळात इक्विटी, म्युच्युअल फंड, कमोडिटी, करन्सी आणि एनपीएस या साधनांमध्ये गुंतवणूक करता यावी, संपत्ती निर्माण करता यावी, याकरीता ‘फिजिटल प्लॅटफॉर्म्स’च्या माध्यमातून भांडवली बाजारातील संधी उपलब्ध करण्यावर या भागीदारीतून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सन २०२१ हे वर्ष दोन दशकांतील ‘सर्वोत्तम आयपीओ वर्ष’ ठरले असल्याची नोंद भारताच्या आर्थिक इतिहासात झाली आहे. नवीन युगातील तंत्रज्ञान कंपन्यांनी आघाडी घेतली होती मात्र पुरेसी जागरुकता, संधी आणि मदत यांच्या अभावामुळे देशाच्या ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांची टक्केवारी या आयपीओंमध्ये अत्यंत कमी आहे.
‘स्पाइस मनी’मध्ये आम्ही देशासाठी आर्थिक समावेशकता वाढवण्याच्या मोहिमेवर असतो. आमची ही भागीदारी आमच्या ‘मार्केटप्लेस प्लॅटफॉर्म’द्वारे ग्रामीण नागरिकांना मेगा आयपीओ आणि भविष्यातील इतर भांडवली बाजाराशी संबंधित उत्पादनांमध्ये सहभागी होण्याची संधी देईल.
स्पाइस मनीसोबत हातमिळवणी करताना आनंद होत आहे. ‘एलआयसी आयपीओ’ची वाटचाल सुरू असताना, नवीन गुंतवणूकदार आणि ‘एलआयसी’चे पॉलिसीधारक यांच्यासाठी मोठी संधी वाट पाहत आहे.
‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेला प्रत्येक गुंतवणूकदार स्पाइस अधिकाऱ्यांच्या मदतीने ‘डायनॅमी अॅप’वर डीमॅट खाते अगदी सुरळीतपणे उघडू शकतो आणि गुंतवणूक साधनांच्या श्रेणींबाबत माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतो.
LIC चा शेअर १७ मे रोजी सूचीबद्ध होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार आणि पात्र कर्मचाऱ्यांना प्रति शेअर ४५ रुपये सवलत मिळेल, तर एलआयसी पॉलिसीधारकांना प्रति शेअर ६० रुपये सवलत मिळणार आहे.